POCRA Scheme : पोकरातील गैरप्रकाराच्या प्रकरणाची चौकशी सुरूच

POCRA Shednet Scam : या योजनेतील वसूलपात्र रक्कम पाहता संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी सप्टेंबर २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कृषी सहसंचालकांना दिले होते.
POCRA 2.0
POCRAAgrowon
Published on
Updated on

Jalna News : जिल्ह्यातील जालना व परतूर उपविभागात पोकराअंतर्गत शेडनेट उभारणी प्रकरणातील गैरप्रकारच्या चौकशीसाठी २१ जूनपासून १८ पथकाकडून चौकशी सुरू आहे. तीन हजारांवर शेडनेटच्या सुरू असलेल्या या चौकशीपैकी शुक्रवारपर्यंत (ता. ४) २३१४ प्रकरणाचीच चौकशी पूर्ण झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणातील चौकशी पथकात जवळपास ३८ अधिकारी असून सुमारे ३२८९ शेडनेट प्रकरणाची तपासणी हे पथक करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २०२०-२१ आणि २०२३-२४ पर्यंतच्या या काळातील शेडनेटगृह उभारणीची ही चौकशी आहे. अधिक माहितीनुसार, यासंदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने पोकराच्या मुंबई कार्यालयातील दक्षता पथकाने डिसेंबर २०२३ मध्ये तपासणी अहवाल सादर केला होता.

POCRA 2.0
POCRA Scam : पोकरातील गैरप्रकारप्रकरणी अहवालानंतर कारवाई

त्यानंतर या योजनेच्या प्रकल्प संचालकांनी जुलै २०२४ मध्ये लेखा परीक्षण अहवाल सादर केला. या योजनेतील वसूलपात्र रक्कम पाहता संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी सप्टेंबर २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कृषी सहसंचालकांना दिले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये मंत्रालयातून विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत गुन्हे नोंदविण्याचा आदेशास स्थगिती देण्यात आली होती.

POCRA 2.0
POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक

परंतु त्यानंतर माशी कुठे शिंकली कोण जाणे अपेक्षित विभागीय चौकशी रेंगाळलेली होती. आता २१ जूनपासून कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असलेले १८ पथके ज्यामध्ये ३८ जणांचा समावेश आहे ती जालना व परतूर उपविभागात चौकशी करीत आहेत. माहितीनुसार २८ जूनपर्यंत ही चौकशी पूर्ण होणे अपेक्षित होते.

परंतु काही अडचणींमुळे चौकशी त्या वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. माहितीनुसार मेजरमेंट बुकमधील ५ ‘क’ फॉरमॅटमध्ये सुरू असलेल्या तपासणीत शुक्रवारपर्यंत (ता. ४) ३२५६ प्रकरणांपैकी २३१४ प्रकरणाचीच चौकशी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशी कधीपर्यंत सुरू पूर्ण होईल व चौकशी अंती या प्रकरणातून काय सत्य बाहेर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com