Nashik NCP : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंड केला. या बंडाखोरांच्या विरोधात शरद पवार मैदानात उतरले आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघापासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच येवल्यात आलेल्या पवारांचा नाशिककरांनी फुले पगडी देऊन सत्कार केले.
शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून छगन भुजबळ ओळखले जात होते. त्यांनी पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. ते राष्ट्रवादीचे ओबीसी चेहरा होते.
पक्षफुटीनंतर आज पहिल्यांदाच शरद पवार नाशिकला पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना पत्रकारांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासूनच का केली? असा प्रश्न विचारला असता. पवारांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून काॅंग्रेस पक्षाला साथ दिली. आमचे सर्वांचे आदर्श यशवंतराव चव्हाण यांना जेव्हा पंतप्रधान पंडित नेहरूंनी बोलावले होते. तेव्हा चव्हाण साहेबांचा लोकसभेत पहिला प्रवेश नाशिकमधून झाला. नाशिककरांनी बिनविरोध त्यांना संसदेत पाठवले. १९८० मी काॅंग्रेसमधून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केला. तेव्हा जिल्ह्यातील सर्व जागा आमच्या पक्षाच्या निवडणून आल्या. या जिल्ह्याने आमच्या विचारांना साथ दिली आहे. त्यामुळे आपल्या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.