Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर जेष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह वडेट्टीवार यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

Sharad Pawar, Rahul Gandhi along with Vijay Wadettiwar On Baba Siddique Murder : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारने जबाबदारी घ्यावी, असे म्हटले आहे.
Baba Siddique Murder
Baba Siddique MurderAgrowon
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी (ता.१२) संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यानंतर आता सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते तथा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत टीका केली आहे.

सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा : शरद पवार

शरद पवार यांनी या घटनेवर खेद व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला आहे. शरद पवार यांनी, याप्रकरणी सरकारने थेट जबाबदारी स्वीकारावी आणि पायउतार व्हावे, अशा शब्दात सरकारचा समाचार घेतला आहे. राज्यात सध्या कायदा सुव्यवस्था कोलमडलेली आहे. ही बाब चिंतेची आहे. देशाची आर्थिक राजधानीत राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. ही बाब खेदजनक असून गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाढा हाकत असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा आहे. यामुळे आता चौकशी नको सरकारने जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे. आपण बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Baba Siddique Murder
Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

तसेच या प्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया एक्सच्या माध्यमातून दिली असून बाबा सिद्दीकीजी यांचं निधन धक्कादायक आणि दुःखदायक असल्याचे म्हटले आहे. तसेच या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं दिसत आहे. यामुळे सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय द्यावा, असेही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सत्ताधाऱ्यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घालावं : वडेट्टीवार

बाब सिद्दिकी यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी, सिद्दिकी यांच्या कार्यालयापुढे येऊन पोलीस संरक्षण असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Baba Siddique Murder
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अनपेक्षित भेटीने भारावले उचगावातील शेतकरी कुटुंबीय

तसेच आता राज्यात कायदा-सुव्यवस्थेची अशी स्थिती निर्माण झाली आहे की सत्ताधाऱ्यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घालावं लागेल. तर सत्ताधाऱ्यांनाच आता जनतेला सांगावं लागेल की आपली सुरक्षा आपणच करा. आम्ही योजना व सत्ता मिळवण्यात व्यस्त आहोत, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

नेमकी घटना कशी घडली?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी शनिवारी रात्री यांच्या कार्यालयात फटाके फोडत होते. त्याचवेळी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. यानंतर सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण अद्याप फरार आहे. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी नावे आहेत. दरम्यान या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com