Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Ramraje Nimbalkar : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा नारळ फिटल्यात जमा आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या झालेल्या दौऱ्यावरून हे सिद्ध झाले आहे. तर येत्या काहीच दिवसात निवडणुकीच्या तारखेवरून पडदा उठेल, अशी शक्यता आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यात निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. एकीकडे महायुतीला पक्षातील बंडखोरी रोखण्याचे आव्हान आहे. यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात सध्या जोरदार इनकमिंग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आताही साखरपट्ट्यातील अजित पवार गटाचे नेते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे महायुतीसह अजित पवार यांची ताकद कमी होईल अशी चर्चा रंगली आहे.

राज्यात काहीच दिवसात विधानसभा निवडणूक घोषित होईल. यामुळे काँग्रेस, भाजप आणि दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपासह उमेदवारींची जुळवाजूळव सुरू झाली आहे. बदलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू झाले आहे. पण गेल्या वेळी सर्वात जास्त पडझड झालेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे.

Sharad Pawar
Maharashtra Elections 2024 : साखरपट्टा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपसह शरद पवार राहूल गांधी मैदानात

आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साखरपट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा फलटणचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात लवकरच प्रवेश करणार आहेत. रामराजे नाईक-निंबाळकर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे तथा विधान परिषदेचे माजी सभापती आहेत. साताऱ्यातील एक मोठा नेता आता शरद पवार यांच्याबरोबर जाणार असल्याने अजित पवार यांची ताकद कमी होईल असे बोलले जात आहे.

दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोलापूर, नगर जिल्ह्यातील बडे नेते आमदारांनी भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती. यातच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील भाजपला धक्का दिला. त्यांनी देखील शुक्रवारी (ता.४) आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर माढ्यातील बबनराव शिंदे, नगरमधील काही आमदार देखील राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) संपर्कात आहेत. यातील काही आमदार आणि फलटणमधील निंबाळकर यांचा प्रवेशा झाल्यास अजित पवार यांची ताकद कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com