Sharad Pawar : '...तर अधिक बरं झालं असतं'; शरद पवारांची मोदी यांच्यावर टीका

Sharad Pawar on Prime Minister Narendra Modi : सोलापूरजवळ कुंभारी येथे झालेल्या विकास कांमाच्या उद्धाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड भावूक झाले होते. त्यावरून त्यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांच्याकडून कुंभारी येथे ३० हजार असंघटित कामगारांसाठी उभारलेल्या घरांच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी प्रचंड भावूक झाले होते. यावेळी त्यांनी, 'या घरांकडे मी जेंव्हा पाहतो तेंव्हा लहापनी असे एखाद घर आपल्यालाही मिळाले असते तर...', असे त्यांनी म्हटलं होते. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात शनिवारी (ता. २० रोजी) जोरदार टीका केली आहे. मोदींनी बेरोजगारी, महागाई यावर बोलले पाहिजे होते. किमान त्यांनी या प्रश्नांचा कुठेतरी ओझरता उल्लेख जरी केला असता तर अधिक बरं झालं असतं. पण त्यांनी मुळ प्रश्नांना बगल दिल्याचे टीका शरद पवार यांनी केली आहे.

आडाम मास्तरांचा उल्लेखच नाही

कुंभारी येथील पहिल्या टप्प्यातील घरांचा हस्तांतर सोहळा पार पडला. त्यावरून शरद पवार यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी या घरांचे खरे श्रेय हे कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम यांचे असल्याचे सांगितले. आडाम मास्तर यांनीच या प्रकल्पाचा मूळ प्रस्ताव तयार केला. त्याला मूर्त रूप देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. मात्र आपल्या भाषणात मोदी यांनी आडाम मास्तर यांचा उल्लेख केला नाही असे म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : पिकविणाऱ्यांकडे दुर्लक्ष नको ः शरद पवार

किमान नाव तरी....

तसेच सोलापूरमधील विधायक कामाबाबत मोदी चार चांगले शब्द बोलले असते, तर अधिक चांगले झाले असते. तर ज्यांनी यासाठी प्रयत्न केलेत त्यांचे किमान नाव तरी घ्यायला हवं होतं. त्यांच्यावर बोलायला हवं होते, पण तसे मोदी यांनी केली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकांच्या पदरात काय पडले?

सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत. जिल्ह्याचे रोजगार, औद्योगिकीकरणाचे प्रश्न आहेत. एकेकाळची औद्योगिक नगरी असणाऱ्या नगरीतील कारखाने बंद पडले आहेत. ४० ते ५० हजार तरूण पुण्यात काम करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणांना बाहेर का जावं लागतं याबद्दल विचार केला पाहीजे. त्याकडे लक्ष द्यायला हवं. मात्र तसे होताना दिसत नाही. पंतप्रधान आले, मुख्यमंत्री आले, पण त्यांच्या येण्याने इथल्या लोकांच्या पदरात काय पडले? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar
Pankaja munde : शरद पवार यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांचा थेट इशारा; म्हणाल्या, '...तर रस्त्यावर उतरावं लागेल'

सत्तेचा दुरुपयोग होत आहे

दरम्यान नातू आमदार रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस पाठवल्यावरूनही शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली. बारामती अॅग्रोशी संबंधित ईडीचे अधिकारी त्यांचे काम करत आहेत. त्या तपासात रोहित पवार ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच, संजय राऊत, देशमुख यांनासुद्धा ईडीची नोटीस आली आली. ईडीचा वापर विरोधकांविरुद्ध होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. रोहित पवार यांना नोटीस आली असेल. पण चिंता करायची कारण नाही, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com