Shaktipeeth Highway : गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग हा शेतकरी शेती पर्यावरण व समाज उध्वस्त करणार आहे. तो मार्ग केवळ भांडवलदारांच्या विकृत डोक्यातील संकल्पना आहे. महामार्गाचा निर्णय हाणून पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ५९ गावातील शेतकऱ्यांचा गोवा ते नागपूर महामार्गाविरोधात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या संघटना गटातटांचे एकत्रीकरण करून पुढील दिशा ठरवण्यासाठी आज (ता.०४) शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न होणार झाला. यामध्ये ५९ गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत याला तीव्र विरोध केला.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले की, नागपूर ते गोवा हा महामार्गास ८६ हजार ००० कोटीच्या चुराडा केला जाणार आहे. या महामार्गाची सुरुवात २०२२ मध्ये त्याची घोषणा झाली २०२३ मध्ये ताबडतोब सगळ्या गोष्टी कागदपत्रे पूर्ण करण्याची शासनाने जबाबदारी घेतली. मला वाटते एवढ्या जलद घेतलेला निर्णय शासनामध्ये पहिल्यांदा झालेला आहे.
अवघ्या काही दिवसात असेसमेंट सर्वे झाला जाहिरात निघाले कुणाच्या जमिनी जाणार सगळी आकडेवारी सगळे गट नंबर सकट सगळं जाहीर झालं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वाशे एकरहून जमीन जाणार आहे. तसेच १२ जिल्ह्यातील हजारे एकर जमीन हा महामार्ग गिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने उतरणे गरजेचे आहे. असे आमदार पाटील म्हणाले.
दरम्यान यावेळी शक्तिपीठ महामार्गाविरोधातील मेळाव्यात ४ ठराव घेण्यात आले.
१) गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर सहीत बारा जिल्यातील शेतकयांची एक इंचही जमीन देणार नाही.
२) राज्यातील मागील काही वर्षात रस्ते निर्मिती मधे पारदर्शकता राहिलेली नाही. याअगोदरील रस्ते व प्रस्तावित रस्ते या वर महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी.
3) रा. शाहू महाराजानी शेतक-यांसाठी कल्याणकारी धोरण राबविले. महाराष्ट्र शामत मात्र शेतकऱ्यांचे शोषण होणारे धोरण राबवीत आहे. आम्ही ठराव करीत आहोत आम्हाला रा. शाहू महाराजांचे शेती धोरण हवे, महाराष्ट्र सरकारचे शेती धोरण नको.
४) याअगोदर सरकारने घेऊन सांगली महामार्ग, रत्नागिरी-नागपूर महामार्ग केले आहेत. त्यांचाच विस्तार करावा! शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. गोवा ते नागपूर जलदगती वंदे भारत सारखी रेल्वे सुरू करावी.
या मेळाव्यास या मेळाव्यास माजी खासदार राजू शेट्टी, सतेज पाटील, ॲड. हिरालाल परदेशी, डॉ. भारत पाटणकर, संजय बाबा घाटगे, गिरीश फोंडे यांच्यासहित विविध मान्यवर उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.