Orange Fruit Fall : संत्रापट्ट्यात लहान आकाराच्या फळांची गळ

Orange Farming : तापमानातील चढउताराचा परिणाम पिकांसोबतच मानवी आणि जनावरांच्या आरोग्यावरही होत असल्याचे चित्र आहे.
Ornage Farming
Orange Farming Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : तापमानातील चढउताराचा परिणाम पिकांसोबतच मानवी आणि जनावरांच्या आरोग्यावरही होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच पूरक उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. संत्रापट्ट्यात आंबिया बहरातील फुले तसेच लहान आकाराच्या फळांची गळ होत असल्याने त्या दृष्टीने उपाय केले जात आहे.

राज्यातील दीड लाख हेक्‍टरपैकी विदर्भात १ लाख २५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. यातील एक लाख हेक्‍टर क्षेत्र हे अमरावती जिल्ह्यात विस्तारले असून त्या पाठोपाठ २५ हजार हेक्‍टर लागवड ही नागपूर तर उर्वरित २५ हजार हेक्‍टर क्षेत्र राज्याच्या इतर भागात आहे. सध्या शेतकऱ्यांद्वारे आंबिया बहाराचे व्यवस्थापन केले जात आहे.

Ornage Farming
Orange Market : हंगाम संपत आला तरीही संत्र्यांची आवक कायम

मात्र रात्री तापमानात घट तर दुपारी वाढ होत असल्याने त्याचा फटका बसत उशीराफुट झालेल्या फुल तसेच लहान आकाराच्या फळांची मोठी गळ होत आहे. इतकेच नाही तर पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भावही वाढीस लागला आहे. बागेची गरज ओळखत पाणी दिले जात आहे, अशी माहिती वाघोली (मोर्शी, अमरावती) येथील संत्रा बागायतदार प्रवीण बेलखेडे यांनी दिली.

Ornage Farming
Orange Market: संत्र्याच्या दरात स्थिरता! मृगातील संत्रा ५० हजार रुपये टन दराने विक्रीत
प्लॅस्टिक किंवा हिरवळीचे मल्चींग करणे योग्य राहील. काही ठिकाणी मल्चींगसाठी धान तणसाचा वापर होतो. यात सिलीका राहते त्याचा फायदा बागेला होतो, असे निष्कर्ष आहे. या पर्यायामुळे बाष्पीभवन सोबतच फळगळ रोखता येणार आहे. - डॉ. विनोद राऊत, उद्यानविद्या विभाग, नागपूर कृषी महाविद्यालय
विदर्भात सध्या पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. नागपूर जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत तापमान ३५.३ ते ३८.७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. किमान तापमान १८.७ ते २०.८ राहण्याची शक्‍यता आहे.
- सचिन वानखडे, कृषी हवामान केंद्र, सीआयसीआर, नागपूर
उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी मुक्त संचार गोठ्याचा वापर करावा, मुबलक प्रमाणात पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, आहारात तंतुमय पदार्थ व प्रथिने कमी करावित, वाळलेला चारा देण्यापूर्वी त्याच्यावर पाणी शिंपडावे, चांगल्या प्रतीचा हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा, हिरवा व सुका चारा कुट्टी करून द्यावा. आहारात चांगल्या प्रतीचा समतोल खुराक द्यावाय. उष्णतेच्या ताणामुळे होणारे आम्ल अपचन टाळण्यासाठी एकत्रित रेशन (टीएमआर) द्यावे. आहारात काही सूक्ष्म पोषणद्रव्ये जसे की जीवनसत्त्व अ, क, ई, सेलेनियम, जस्त द्यावित, आहारात नियमित प्रत्येकी २५-३० ग्रॅम मीठ व खनिजक्षार मिश्रण द्यावे.
- डॉ. अनिल भिकाने, विस्तार संचालक, माफसू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com