
Water Shortage Amravati News : चिखलदरा तालुक्यातील चुरणी ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत असून, या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून पाण्याची भीषण टंचाई आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी सुद्धा टंचाईकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली.
गावाची लोकसंख्या दहा-बारा हजारांच्या घरात असून, पाण्याचे मोठे स्रोत या ठिकाणी उपलब्ध व्हायला हवे होते. मात्र शासनाने मर्यादित पाण्याचे सोर्स या ठिकाणी उपलब्ध केल्यामुळे या ठिकाणची विहीर कोरडी झाली.
त्यामुळे गावाला पाणीपुरवठा होत नाही. या ठिकाणचे हॅण्डपंपसुद्धा सुकले आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दरम्यान, गावातील महिलांना रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायतीवर धडक दिली. रविवार असल्याने सचिवसुद्धा उपलब्ध नव्हते, त्यामुळे या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. गावाला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली.
यामध्ये चंद्रकला कवडे, वैशाली पाटणकर, ममता येवले, अस्मिता येवले, अंजनी पाटणकर, पुष्पा कवडे, अंजनी रेचे, पिचूबाई आठोले, अनिता येवले, रामप्यारी अमोदे, पार्वती कवडे, राधाबाई पाटणकर, कलाबाई आंबेडकर, नीलेश उईके, भारत आठोले, नयन निवतकर, साई टेकाम, अभी आंबेडकर, कृष्णा कवडे, लव जगदेवे उपस्थित होते.
चुरणी ग्रामपंचायतीचे सचिव मुख्यालयी राहत नाही. सचिवावर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. अन्यथा, ग्रामपंचायतीला आज (बुधवारी) कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.