Land Ownership : सतरा कातकरी कुटुंबांना मिळाली जमिनीची मालकी

Money Lenders : सावकारांच्या जाचातून सोडविलेली जमिनीची मालकी १७ कातकरी कुटुंबांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १३) परत देण्यात आली. या कुटुंबांना त्यांच्या जागांचे सातबारे देण्यात आले.
Agriculture Land Dispute
Agriculture Land DisputeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : सावकारांच्या जाचातून सोडविलेली जमिनीची मालकी १७ कातकरी कुटुंबांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १३) परत देण्यात आली. या कुटुंबांना त्यांच्या जागांचे सातबारे देण्यात आले.

पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील काहींना २०० रुपये देऊन किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन सावकारांनी बळकावलेल्या जमिनी सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये एक समिती स्थापन केली होती. या कामाला गती देण्यासाठी चावडी वाचनाचे आदेशही दिले होते. त्या समितीने तयार केलेल्या अहवालानंतर संबंधित कुटुंबांना जमिनी परत देण्यात आल्या.

Agriculture Land Dispute
Agriculture Land : जमीन नकाशासाठी हेलपाटे बंद होणार

स्वतः: जमीनदार असून काही जमीनमालक झोपडीत राहत असल्याचे समोर आले होते. फडणवीस यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

Agriculture Land Dispute
Land Dispute : जुने बक्षीसपत्र अन् बदलती परिस्थिती

श्री. फडणवीस म्हणाले, ‘कातकरी समाजाच्या बांधवांना जागेचा ताबा तातडीने प्रशासनाने द्यावा. शासकीय खर्चाने त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्यात, योग्य सीमांकन आखून देण्याची कार्यवाही करावी.

तसेच आदिवासींच्या जमिनी कुणीही हडपणार नाही, असा जीआर जारी करा. पोलिसांनी आदिवासी समाजाला संरक्षण द्यावे, आज ज्या १७ जणांना जमिनी दिल्या, त्यांच्याकडे दर महिन्याला भेट देऊन, कुणी त्यांना धमकाविते का, याची माहिती घेत रहा. कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com