Boat Accident In Gadchiroli :गडचिरोलीत उलटली मिरची तोडणी मजुरांची नाव; सात महिला बुडाल्या

Seven women drowned in Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गणपूर रै परिसरावर शोककळा पसरली आहे. येथे मिरची तोडणी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने सात महिला बुडाल्या.
Boat Accident In Gadchiroli
Boat Accident In GadchiroliAgrowon
Published on
Updated on

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील नदीमध्ये नाव उलटल्याने सात महिला बुडाल्या. यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून एकास वाचविण्यात यश आले आहे. तर इतर पाच महिलांचा शोध घेतला जात आहे. ही दुर्घटना मंगळवारी (२३ रोजी) घडली असून गणपूरजवळ वैनगंगा नदीत घडली आहे. तर याचे कारण चिचडोह प्रकल्पाचे सोडलेले पाणी असल्याची चर्चा आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना रोजगारासाठी आजही पायपीट करावी लागते. त्यांना रोजगारासाठी राज्याची सीमा ओलांडून आहेर जावं लागते.  दरम्यान आता मिरची तोडण्याचा हंगाम सुरु झाला आहे. यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हातील हजारो शेतमजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडणासाठी जातात. अशातच ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैनगंगा नदीत २२ जानेवारीला अचानक चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे पाण्याची पातळीही वाढली. तर नाव नदी पात्राच्या मध्यभागी येताच बुडाली. या दुर्दैवी घटनेत सहा महिलांचा दुदैवी मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या पैकी एक महिला बचावली असून एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. तसेच इतर पाच महिलांचा शोध घेतला जात आहे. त्या महिलांचा शोध चामोर्शी पोलीस घेत असून त्यांनी शोधमोहीमेचा वेग वाढवला आहे. तसेच ही घटना कशी घडली याचा तपासही सुरू केला आहे.

Boat Accident In Gadchiroli
Poultry, Duck Keeping Lessons : गडचिरोली जिल्ह्यातील ८६ युवकांनी घेतले कुक्कुट, बदकपालनाचे धडे

नावाड्या वाचला

या घटनेत गणपूरच्या (रै.) पोलीस पाटलाची पत्नी वाहून गेली आहे. तसेच सहा महिला बूडाल्या होत्या. यावेळी नावाड्याला पोहोता येत असल्याने त्याने एका महिलेस वाचविले. मात्र इतरांना त्याला वाचवणे शक्य झाले नाही. सध्या इतर महिलांचा शोध घेतला जात असून एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. 

Boat Accident In Gadchiroli
Agriculture Electricity : गडचिरोली जिल्ह्यात मिळणार शेतीला दिवसा वीजपुरवठा

कोण होते नावेत 

या नावेत मिरची तोडणासाठी ७ महिला निघाल्या होत्या. तर नाव नावाडी चालवत होता. पाण्याचा प्रवाह वाढल्याने ती नाव वाहून गेली आणि सात महिला पाण्यात बूडाल्या. यावेळी नावाड्याला पोहता येत असल्याने त्याने सारूबाई कस्तूरे यांना वाचवले. पण इतर सहा महिला बुडाल्या. दरम्यान जीजाबाई राऊत यांचा मृतदेह सापडला असून तो बाहेर काढण्यात आला आहे. तर रेवंता हरिदास झाडे, पुष्पा मुक्तेश्वर झाडे, माया बाई अशोक राऊत, सुषमा सचिन राऊत आणि बुदाबाई देवाजी राऊत या महिलांचा शोध घेतला जात आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com