Sheshshayi Vishnu Murti : शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजामध्येच राहणार

Sindkhed Excavation : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीजवळील शिवमंदिर परिसरात उत्खनन केले जात असून तेथे शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली आहे.
Sheshshayi Vishnu Murti
Sheshshayi Vishnu MurtiAgrowon

Buldhana News : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीजवळील शिवमंदिर परिसरात उत्खनन केले जात असून तेथे शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली आहे. पुरातत्त्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशायी विष्णूची मूर्ती सिंदखेडराजा येथेच राहील, अशी माहिती भारतीय पुरातत्त्व विभागाचे पुरातत्त्वशास्त्रच अरुण मलिक यांनी दिली.

भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे. मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोलीवर भव्य शेषशायी विष्णूची मूर्ती आढळून आली होती. ही मूर्ती साधारणतः अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याचा अंदाज आहे. ही मूर्ती दीड मीटर बाय सव्वा मीटर आकाराच्या दगडामध्ये कोरलेली आहे.

Sheshshayi Vishnu Murti
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

समुद्रमंथन आणि दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम या मूर्तीमध्ये करण्यात आलेले आहे. ही मूर्ती क्लोरियट दगडामध्ये आहे. साधारणतः हा दगड दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून येतो. या दगडावर बारीक कोरीव काम करणे शक्य आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सर्वसाधारण मानकानुसार उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येतात.

Sheshshayi Vishnu Murti
Maharashtra Politics : केंद्राप्रमाणे राज्य सरकारही विश्‍वासघातकी

या नियमानुसार सिंदखेडराजा येथे आढळलेली शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजा येथेच जतन केल्या जाईल. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाच्या परिसरातच ही मूर्ती सुव्यवस्थितरित्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.

येत्या एका आठवड्यामध्ये या मूर्तीबाबत संशोधन होऊन अधिकची माहिती प्राप्त होईल. सध्यास्थितीमध्ये मूर्तीचे काळजीपूर्वक हाताळणे आणि योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही श्री. मलिक यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com