E Pik Server Down : ई-पीक नोंदणीत सर्व्हर डाऊनची समस्या, अंतिम मुदतीमुळे शेतकऱ्यांची धावपळ

E-Pik Registration Server Outage Problem: पीक क्षेत्रातील योग्य आकडेवारी उपलब्ध झाल्यास शासनाला त्यानुसार धोरण ठरविता येते. यासाठी शासनाने ई-पीक पाहणीचे ॲप उपलब्ध करून दिले आहे.
E-Pik Server Down
E-Pik Server DownAgrowon
Published on
Updated on

E-Pik System Downtime Causing Delays : ई -पीक पाहणीची अंतीम मुदतजवळ आल्याने शेतकरी नोंदणी करण्यासाठी बांधावर जात आहे परंतु ई-पीक नोंदणीत सर्व्हर डाऊनची समस्या येत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे प्रशासनाने आवाहन केले असताना सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त आहेत. २३ सप्टेंबरपर्यंत पीक नोंदणीची अंतिम मुदत असून, सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे ती या काळात पूर्ण होणे अवघड आहे. त्यामुळे शासनाने मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

पीक क्षेत्रातील योग्य आकडेवारी उपलब्ध झाल्यास शासनाला त्यानुसार धोरण ठरविता येते. यासाठी शासनाने ई-पीक पाहणीचे ॲप उपलब्ध करून दिले आहे. मात्र, जिल्ह्यात याबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जागृती झालेली नाही. शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलमधून ई-पीक नोंदणी करता येते.

मात्र, नोंदणी करताना वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतातील उभ्या पिकांचे फोटो अपलोड होत नसल्याने ई-पीक नोंदणी पूर्ण होत नाही. पीक विमा तसेच इतरही अनेक बाबींसाठी सात-बारा उताऱ्यावर अद्ययावत पीक पेऱ्याची नोंद असणे आवश्यक आहे.

२३ सप्टेंबरपर्यंत पीक नोंदणीची अंतिम मुदत असून, सर्व्हर डाऊनमुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने ई-पीक नोंदणीसाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे. यावर्षी ई-पीक नोंदणीसाठी अडचणी येत आहे. ॲप मध्येच बंद पडत असल्याने अडथळे येत आहेत.

दिवसभर ॲप चालत नसल्याने सकाळ-संध्याकाळच्या वेळी ई-पीक नोंदणी करावी लागते. शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ॲप व्यवस्थित चालत नसल्याने उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीकनोंदणी विहित मुदतीत पूर्ण होणार नसल्याचे मत शेतकऱ्यामधून व्यक्त केले जात आहे.

E-Pik Server Down
E - Pik Pahani : टाकळी येेथे ई पीक नोंदणीचा सर्व्हर ठप्प

मागील वर्षी ई-पीक नोंदणी करताना सर्व्हर डाऊनची फारशी समस्या येत नव्हती. महसूल विभागाकडून तलाठी शेतात येऊन अडचणी सोडवत आहेत. ई-पीक नोंदणी करताना सर्व्हर डाऊनमुळे येत असलेल्या अडचणींबाबत वरिष्ठांना कळविले असल्याची माहिती करवीर तालुक्यातील राशिवडे गावचे मंडल अधिकारी श्री कोरे यांनी सांगितले.

ई-पीक नोंदणीचे फायदे :

शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार

नोंदणीमुळे राज्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे, याची अचूक आकडेवारी

पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश आणि रेखांशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे याची माहिती मिळणार

ई-पीक नोंदणीतील अडथळे..

सर्व्हर डाऊनमुळे छायाचित्र अपलोड करता येत नाही

सर्व्हर सावकाश गतीने काम करत असल्याने जास्त वेळ लागतो

ॲपमध्ये नाव नोंदणीनंतर काही टप्पे पूर्ण होतात. मात्र सर्व्हर डाऊनमुळे प्रक्रिया पूर्ण होत नाही

शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शनाचा अभाव

सर्वच शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com