Agri Business: उन्हाळ्यातील उष्ण आणि कोरडे वातावरण रेशीम संगोपनासाठी आव्हानात्मक असते. मात्र योग्य व्यवस्थापन केल्यास उत्कृष्ट दर्जाचे कोष उत्पादन मिळविता येते. तापमान आणि आर्द्रतेचे संतुलन, तुतीच्या पानांची गुणवत्ता, स्वच्छता आणि रोग नियंत्रण या बाबींवर विशेष लक्ष दिल्यास दिल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञान व योग्य व्यवस्थापन केल्यास रेशीम उद्योग शेतकऱ्यांसाठी स्थिर आणि फायदेशीर उत्पन्नाचे साधन ठरू शकतो..उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात होणारी मोठी वाढ, कमी आर्द्रता, कोरडे वारे आणि तुतीच्या पानांतील ओलाव्याची कमतरता आदी कारणांनी रेशीम उद्योगात अनेक अडचणी येतात. या काळात योग्य व्यवस्थापन न केल्यास रेशीम अळ्यांची वाढ मंदावते, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि कोष उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना काही महत्त्वाच्या बाबींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे..Silk Farming: रेशीम अळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन.स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाला प्राधान्यसंगोपनगृहात रेशीम उत्पादनावेळी स्वच्छतेचा अभाव असेल तर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक संगोपनचक्र सुरू करण्यापूर्वी संगोपनगृहाची संपूर्ण स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.प्रत्येक बॅच पूर्ण झाल्यानंतर रोगग्रस्त अळ्या, खराब कोष गोळा करून जाळून नष्ट करावेत.संगोपन घर आणि उपकरणांचे प्रथम निर्जंतुकीकरण करावे.बॅच सुरू करण्यापूर्वी संगोपनगृह, ट्रे, जाळ्या, उपकरणे इत्यादींची त्वरित स्वच्छता करावी. त्यासाठी चुना व ब्लिचिंग पावडर किंवा शिफारस केलेले निर्जंतुकीकरण द्रावण वापरावे.नवीन संगोपन सुरू करण्यापूर्वी ४ दिवस आधी चुन्याच्या द्रावणाने संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण करावे.संगोपनगृहात अनावश्यक व्यक्तींची ये-जा टाळावी.रेशीम अळ्यांना टाकलेली तुती पाने आणि कचरा वेळोवेळी काढून त्यांची विल्हेवाट लावावी..खाद्य व्यवस्थापनरेशीम अळीच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर खाद्याचे प्रमाण आणि प्रकार वेगळा असतो. लहान अवस्थेतील अळ्यांना बारीक कापलेली कोवळी पाने द्यावीत. मोठ्या अवस्थेतील अळ्यांना फांद्या देणे योग्य ठरते. अळ्यांच्या योग्य वाढीसाठी तुतीची पाने देण्याचे वेळापत्रक नियमित ठेवणे आवश्यक आहे. जास्त पाने टाकल्यास पाने कुजण्याची शक्यता असते, त्यामुळे आवश्यक तेवढीच पाने द्यावी..Silk Farming: शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे.कोष व्यवस्थापनअळ्या पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या कोष तयार करण्यासाठी योग्य जागा शोधतात. यासाठी चंद्रिकाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. चंद्रिका स्वच्छ, कोरडी आणि हवेशीर असावी. परिपक्व झालेल्या अळ्यांना योग्य वेळी चंद्रिका वापरल्यास चांगल्या प्रतीचे कोष तयार होतात. कोष तयार होण्याच्या काळात तापमान आणि आर्द्रता संतुलित ठेवणे आवश्यक असते..उन्हाळ्यात घ्यावयाची काळजीसंगोपनगृहातील तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ७० ते ८५ पर्यंत ठेवावी.खिडक्यांवर ओल्या गोण्या किंवा पडदे लावून थंडावा निर्माण करावा.तुतीची पाने सकाळी किंवा संध्याकाळी तोडावीत.रेशीम अळ्यांना द्यावयाची तुती पाने धूळमुक्त असावीत.संगोपनगृह, ट्रे आणि उपकरणे नियमित स्वच्छ ठेवावीत. प्रत्येक बॅचपूर्वी निर्जंतुकीकरण करावे.रोगमुक्त अंडी (DFL) वापरणे आवश्यक आहे.रेशीम अळ्यांना आवश्यक तेवढीच पाने द्यावीत.रोगग्रस्त अळ्या वेगळ्या काढून नष्ट कराव्यात.कोष तयार करण्यासाठी स्वच्छ चंद्रिकेचा वापर करावा..Silk Farming Management: दर्जेदार कोष उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर.रोग व कीड नियंत्रणउन्हाळ्यात तापमान जास्त वाढल्यामुळे रेशीम अळीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अळ्यांमध्ये काही असामान्य लक्षणे दिसल्यास अशा अळ्यांना त्वरित वेगळे करणे आवश्यक आहे. रेशीम अळी पालनासाठी नेहमी रोगमुक्त अंडी (Disease Free Layings – DFL) वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य तापमान नियंत्रण, स्वच्छता, दर्जेदार तुतीची पाने आणि रोगमुक्त अंडी यांचा वापर केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि चांगल्या प्रतीचे कोष उत्पादन मिळते. तसेच शिफारस केलेल्या औषधांचा वापर केल्यास रोगांचा प्रसार रोखता येतो..फ्लॅचरीया रोगाचा उन्हाळ्यात रेशीम अळीवर सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येतो. हा रोग प्रामुख्याने जास्त तापमान, खराब तुतीची पाने व अस्वच्छता यामुळे होतो. हा रोग जिवाणू किंवा विषाणूंमुळे देखील होऊ शकतो.लक्षणेअळी सुस्त होते. हालचाल कमी होते.अळीचे शरीर मऊ व सैल होते.अळी पाने खाणे बंद करते.अळीचे शरीर तपकिरी किंवा काळसर दिसू लागते.अधिक प्रादुर्भाव असल्यास अळीचा मृत्यू होतो.Silk Farming: रेशीम शेडमधील तापमान, आर्द्रता नियंत्रित राखण्यावर भर.व्यवस्थापनसंगोपनगृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रित ठेवावी.ताजी व स्वच्छ तुती पाने रेशीम अळ्यांना द्यावीत.संगोपनगृहाची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.रोगग्रस्त अळ्या त्वरित जमा करून त्यांची विल्हेवाट लावावी.शिफारस केलेली औषधे वापरावीत..ग्रासरीहा रोग विषाणूमुळे होतो. उन्हाळ्यात तापमानातील बदल, धुळीच्या कणांमुळे, जास्त आर्द्रता किंवा खराब पानांमुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.लक्षणेप्रादुर्भावग्रस्त अळीचे शरीर फुगलेले दिसते.शरीर पारदर्शक किंवा चमकदार दिसते.अळी सुस्त होते.अळीचा मृत्यू झाल्यानंतर शरीरातून द्रव बाहेर पडतो..व्यवस्थापनरेशीम उत्पादनासाठी रोगमुक्त अंडीपुंजाचा (DFL) वापर करावा.संगोपनगृह स्वच्छ व हवेशीर ठेवावे.संगोपनगृहात जास्त आर्द्रता टाळावी.रोगग्रस्त अळ्या गोळा करून लगेच नष्ट कराव्यात.ट्रे व उपकरणे निर्जंतुक करावीत.धूळयुक्त पाने अळ्यांना खाण्यासाठी देऊ नये.- अशोक जाधव, ९०७५०८८७५५(संशोधन विस्तार केंद्र, केंद्रीय रेशीम बोर्ड, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.