Jayant Narlikar Death: वृद्धापकाळाने ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

Pune Astronomer Passed Away: जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि ‘आयुका’ संस्थापक डॉ. जयंत नारळीकर यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी विज्ञान प्रसार आणि साहित्य क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे.
Astronomer Jayant Narlikar
Astronomer Jayant NarlikarAgrowon
Published on
Updated on

Pune News: पद्मविभूषण, पद्मभूषण या भारतीय नागरी सन्मानांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (ता.२०) पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नारळीकरांनी उत्तुंग कामगिरी केली. त्यांच्या पश्‍चात तीन मुली आहेत.

डॉ. नारळीकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर यांची मंगळवारी पहाटे झोपेतच प्राणज्योत मालवली. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले होते. डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते.

Astronomer Jayant Narlikar
Dr. Jayant Naralikar passed away : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

त्यांच्या मातोश्री सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले होते. खगोलशास्त्रातील संशोधनामुळे त्यांना जगभरात मान्यता मिळाली होती. त्यांनी १९८८ मध्ये सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची स्थापना केली आणि त्याचे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.

Astronomer Jayant Narlikar
Arun Jagtap Passes Away : माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन

जयंत नारळीकरांनी ११ जून १९६४ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला होता. डॉ. नारळीकर यांनी मराठीतून सहजसोप्या भाषेतून विज्ञानप्रसाराचे काम केले होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञानकथा, लघुनिबंध, पुस्तके अशी विपुल साहित्य संपदा लिहिली. नाशिक येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात गीता, गिरीजा, लिलावती या तीन मुली असून, त्या विज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.आज (ता. २१) दुपारी १२ वाजता ‘आयुका’ येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच दुपारी १ वाजता वैकुंठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com