Jowar Harvesting : ज्वारी काढणीसाठी मजूर मिळेना!

Team Agrowon

आधीच दुष्काळाचे संकट आणि त्यातही कशीबशी पेरणी करून आलेल्या ज्वारी पीकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Summer Jowar Sowing | Agrowon

अशा विचित्र परिस्थितीत सध्या जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातला शेतकरी सापडला आहे.

Kharif Jowar

यंदा मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. कमी पावसाअभावी रब्बीच्या पेरण्यांना उशीर झाला. दुष्काळी स्थिती असतानाच झालेल्या अवकाळी पाऊस झाला.

Kharif Jowar

रानं मोकळी राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली. यातून काही उत्पन्न मिळेल शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तरी भागेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

Summer Jowar Sowing | Agrowon

त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली. हंगाम संपल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या जोरावर ज्वारी लावली.

Summer Jowar Sowing | Agrowon

आता ज्वारीचे पीक काढणीला आले आहे. मात्र, काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाल्याचे चित्र आहे.

Kharif Jowar