Poultry Farming : परसबागेसाठी अर्धबंदिस्त कुक्कुटपालनाचे तंत्र

ग्रामीण भागात परसबागेत कुक्कुटपालन केले जात असले तरी त्यात अनेक वेळा व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो. परिणामी, अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातील कुक्कुटपालन शास्त्र विभागाने अर्धबंदिस्त कुक्कुटपालनाचे तंत्र विकसित केले आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

शेळीपालनामध्ये (Goat rearing) अर्धबंदिस्त पद्धती आता बऱ्यापैकी रुजली आहे. तसेच गाई, म्हशी (buffalo) यांच्या पालनामध्ये मुक्त संचार गोठ्याचाही वापर वाढत आहे. या पद्धतीचे अनेक फायदे दिसून येतात. मात्र आजही व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये (Poultry Farming) प्रामुख्याने बंदिस्त पद्धतीचा अवलंब केला जातो. तर परसबागेमध्ये मुक्त पद्धतीने कोंबड्या पाळल्या जातात.

Poultry Farming
Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

यातून पक्षी व्यवस्थापनाच्या अनेक बाबींकडे शेतकऱ्याचे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेत परसबागेतील कुक्कुटपालनाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातील कुक्कुटपालन शास्त्र विभागाने पुढाकार घेतला. त्यांनी ५० पक्ष्यांच्या अर्धबंदिस्त संगोपनाची संकल्पना मांडली. या विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद कदम यांच्यासह डॉ. गजानन नागरे, डॉ. आश्‍विनी कोंढारे या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तडीस नेला.

...अशी आहे संकल्पना व तपशील

संकल्पनेतील पक्षिगृह लोखंडी पोर्टेबल आहे. ४८ चौरस फूट आकारामध्ये ५० पक्षी राहू शकतात.

पक्षिगृहाचे आकारमान

मध्य भागातील उंची : सहा फूट

लांबी ः आठ फूट.

रुंदी ः सहा फूट.

बाजूची उंची ः पाच फूट.

हुकसह ओव्हरहँग ः १२ इंच.

वेल्डेड आयर्न एमएस पाइप ः ११२ चार फूट (चार बाजूंनी १ बाय १ चौरस आकार).

फाउंडेशन बेस ः एमएस पाइप ः ६ इंच.

दरवाजा ः बाहेर उघडणारा ३ बाय ५ फूट.

दरवाजासाठी बिजागरी ः २ (तीन इंची).

छत जीआय शीट ः ०.४० गेजसह ६४ चौरस फूट.

फीडर आणि पाणी टांगण्यासाठी मध्यभागी रॉड.

दरवाजाबाहेर बटणासह इलेक्ट्रिक स्वीच.

गंजणे व अन्य बाबीपासून सुरक्षितता मिळण्यासाठी पेंट आणि ऑइल पेंटचा एक थर देऊन घ्यावा.

परसबागेतील कुक्कुटपालनाकरिता शेडचा उपयोग

सुरुवातीला परसबागेतील कुक्कुटपालनासाठी या मॉडेलचा उपयोग करण्यात आल्याचे डॉ. मुकुंद कदम यांनी सांगितले. त्यानंतरच्या काळात अर्धबंदिस्त कुक्कुटपालन या संकल्पनेवर त्यांनी काम सुरू केले. त्याकरिता अभ्यास सुरू करण्यात आला. हजार चौरस फूट (एक गुंठा) आकाराची जागा याकरिता हवी. त्या जागेत हे फॅब्रिकेटेड मॉडेल ठेवावे. या जागेच्या चौफेर सावली देणारे वृक्ष असावेत. या माध्यमातून पक्षिशेडला सावली मिळेल. कुत्री, मांजर व इतर प्राण्यांपासून कोंबड्यांच्या संरक्षणासाठी एक गुंठा क्षेत्राला तारेचे कुंपण असावे.

Poultry Farming
Agro Idol: स्वत:च स्वत:चे आयडॉल बना

गावरानऐवजी ब्रॉयलर पक्षी वापर

गावरान किंवा अन्य जातीच्या पक्ष्यांची सहज उपलब्धता होत असल्यास त्या जाती वापरण्यास हरकत नाही. मात्र दर ३५ ते ४० दिवसांनी या जातींच्या पक्ष्याची पिले उपलब्ध होण्यात अडचणी असल्याचे दिसून आले. तुलनेमध्ये मांसल (ब्रॉयलर) पक्ष्यांची वेळेवर उपलब्ध होतात आणि त्यांचे संगोपनही व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ब्रॉयलर कोंबड्यांचे वजन (दीड किलो) कमी कालावधीत (सुमारे ३५ दिवसांत) मिळते.

आहाराविषयी...

या तंत्रामध्ये पक्ष्यांना संतुलित आहार हा केवळ रात्रीच्या वेळी ते पिंजऱ्यात असताना दिला जातो. दिवसा एक गुंठ्यातील जागेमध्ये आठवडी बाजारातील उपलब्ध झालेला किंवा पीक अवशेषातील भाजीपाला, घरात उरलेले अन्न, मोड आलेले गहू, मका, अ‍ॅझोला, हायड्रोपोनिक पद्धतीचे अंकुर पुरवले जातात. त्याच प्रमाणे परिसरात थोड्या फार प्रमाणात शेण टाकल्यामुळे त्यात काही कीटकांची उत्पत्ती होते. अशा प्रकारे कमी खर्चात किंवा निःशुल्कच खाद्य उपलब्ध होते. बऱ्यापैकी मुक्त वावर, संतुलित आणि पौष्टिक खाद्यान्न यामुळे पक्ष्याची वाढ वेगाने होते. परिसरात बरसीम, लुसर्न जातीचे गवत लावल्यास त्याचाही कोंबड्यांना खाद्यान्न म्हणून उपयोग होते. ‘माफसू’च्या सल्लागार समितीनेही या अभिनव मॉडेलला मान्यता दिल आहे.

माफसूच्या मॉडेलचा विस्तार

तत्कालीन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी हे प्रारूप पाहिले होते. त्यांनी या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. त्यातूनच नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील सदस्यांसोबतच शेतकरी गटांना याचे वितरण करण्यात आले. अनेक शेतकरी या मॉडेलमध्ये कोंबड्यांचे संगोपन करीत आहेत.

गडचिरोलीतील दहा गावे, देवरी (गोदिंया) येथील चार गावांमध्ये या संकल्पनेच्या विस्तारासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचाही समावेश असेल. देवरी (गोंदिया) भागामध्ये श्यामप्रसाद मुखर्जी वनधन योजनेतून आदिवासी शेतकऱ्यासाठी निधीची उपलब्धता करण्याचे प्रस्तावित असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

- अश्‍विनी कोंढारे, ८३०८११९१३९

- डॉ. मुकुंद कदम, ८८८८८३६३७४

Poultry Farming
Dairy And Poultry Industry : दूध उत्पादनाचा खर्च कमी कसा कराल ?| Dr. Dinesh Bhosale | ॲग्रोवन

...असे आहे अर्थकारण

पक्षी पिलू किंमत ः ३० रुपये

खाद्य किंमत ः ३३ रुपये किलो

इतर खर्च ः पाच रुपये प्रति पक्षी

संतुलित आहार ः १६३० ग्रॅम

खाद्यावरील खर्च ः ५३.८० रुपये प्रति पक्षी

३५ दिवसांनंतर वजन ः १५०० ग्रॅम

दीड किलो पक्ष्यावरील एकूण खर्च ः ८८.८० रुपये.

दर व उत्पन्न ः सुमारे १०० रुपये प्रति किलोचा दर आणि दीड किलोचा पक्षी या प्रमाणे १५० रुपये मिळू शकतात.

निव्वळ नफा ः १५० - ८८.८० = ६१.२० रुपये प्रति पक्षी.

एकूण ५० पक्ष्यांच्या संगोपनातून २९९९ रुपये निव्वळ नफा हाती राहतो. (एक पक्षी मरतूक गृहीत धरून ताळेबंद मांडला आहे.)

पावसाळ्याच्या दिवसातही या संकल्पनेनुसार (अर्धबंदिस्त पद्धतीने) संगोपन करणे शक्य होणार नाही. ऑक्टोबर ते एप्रिल असे सात महिने हा व्यवसाय केल्यास चार बॅच मिळू शकतात.

Poultry Farming
GM Crops : काय आहेत जीएम पिकांचे फायदे-तोटे?

जिवंत पक्षी विकल्यास २९९९ रुपये प्रति बॅच नफ्याप्रमाणे चार बॅचच्या माध्यमातून ११ हजार ९९५ रुपये उत्पन्न होते.

त्यातही पुढील प्रक्रिया करून (उदा. पक्षी कापून विकल्यास) १००० ग्रॅम (एक किलो) मांस मिळते. त्याची विक्री २०० रुपये किलोप्रमाणे केल्यास नफ्याचे प्रमाण दुप्पट होते. चार बॅचमधून २३ हजार ९९० रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. यात मरतूक झालेल्या पक्ष्यांच्या संगोपनावरील खर्चही धरला, तरी २३ हजार ६३५ रुपये हाती शिल्लक राहत असल्याचे डॉ. मुकुंद कदम यांनी सांगितले.

ब्रॉयलर पक्षी एक ते दहा दिवसांचे असेपर्यंत त्यांचे संगोपन बंदिस्त पद्धतीनेच होणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांना बाहेर काढता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com