GM Crops : काय आहेत जीएम पिकांचे फायदे-तोटे?

जीएम पिके अन्नसुरक्षेचा आधार बनू शकतात असे काही जाणकारांचे मत आहे. अशा परिस्थितीत जीएम पिके कोणती आहेत आणि त्यांचे फायदे-तोटे काय आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.
GM Crops
GM CropsAgrowon

पर्यावरण मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने (जीईएसी) २५ ऑक्टोबर रोजी जीएम मोहरीच्या (GM Musterd) डीएमएच-११ (DMH-11) या  वाणाच्या व्यावसायिक वितरणासाठी मंजुरी दिली होती. मात्र, जीएम पिकांना विरोध करणाऱ्या तज्ज्ञांनी न्यायालयात जाऊन फुलोऱ्यापूर्वीच ही पिके नष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते अंकुरणाचे परिणाम चाचणीसाठी पुरेसे आहेत, जरी या वनस्पती वाढल्या तर त्यांना पर्यावरण प्रदूषित होण्याचा धोका आहे. दुसऱ्या बाजूला जीएम पिके (GM Crop) हे शेतीचे भविष्य आहेत, असे मानणाऱ्या शास्त्रज्ञांची एक बाजू आहे.  जीएम पिके अन्नसुरक्षेचा आधार बनू शकतात असे काही जाणकारांचे मत आहे. अशा परिस्थितीत जीएम पिके कोणती आहेत आणि त्यांचे फायदे-तोटे काय आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.

GM Crops
Sugarcane Trash Use : पाचट आच्छादनाचे फायदे काय आहेत?

जीएम पिके म्हणजे काय?

ढोबळ भाषेत दोन भिन्न वाणांमधील अनुकूल जनुक एकत्रित करून जे वाण तयार केले जाते त्याला जनुकीय सुधारित वाण म्हणतात. या प्रक्रियेने तयार केलेल्या वनस्पतीमध्ये नवीन जनुक त्याच्या नवीन गुणधर्माने विकसित होतो. या प्रक्रियेच्या मदतीने शास्त्रज्ञ आवश्यकतेनूसार वनस्पतीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. यामुळे वनस्पतींमध्ये अनेक बदल होऊ शकतात जसे की वनस्पती कशी आणि कोणत्या परिस्थितीत वाढू शकते किंवा वनस्पती कोणत्याही रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित करू शकते. यामुळे उत्पन्न वाढू शकते. त्याचबरोबर उत्पन्नामध्ये अनुकूल घटकांचा वाटा वाढवता येतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जीएम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शास्त्रज्ञ आवश्यकतेनूसार किंवा गरजेनूसार वनस्पतीमध्ये बदल घडवून आणू शकतात.

GM Crops
Zero Tillage Technology: शून्य मशागतीचे फायदे काय आहेत ?

जेव्हा देशात मोहरीचे उत्पादन वाढविण्याची गरज भासू लागली. त्यावेळी भारतातील मर्यादित सिंचन सुविधा व जमिन मोहरीसाठी फारशी फायदेशीर नसल्याने मोहरीचे उत्पादन जागतिक सरासरीपेक्षा कमी होते, त्यामुळे पिकात जनुकीय बदल करण्याचा विचार पुढे आला. भारतात जनुकिय सुधारित कापसाला २००२ साली मान्यता  मिळाली. दुसरे पीक म्हणून जीएम मोहरीच्या शेतातील चाचण्या सुरू आहेत तर वांग्याच्या जीएम वाणाला अजून परवाणगी मिळालेली नाही.  

GM Crops
GM Crop Ban : जनुकीय चाचण्यांवर सरसकट बंदी नको

जीएम पिके महत्त्वाची का आहेत?

जीएम पिके विकसीत करण्यामागील मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या. पारंपरिक पद्धतीने पिकविलेली पिके अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करू शकत नाहीत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील बदल, प्रदूषण, कमी होत चाललेली शेतजमीन आणि जमिनीची घटती सुपीकता यामुळे अन्नधान्याचे आवश्यक उत्पादन होत नाही. या कारणांमुळे उपलब्ध साधनांचा वापर करुन अन्नधान्याची मागणी पूर्ण करू शकतील अशी पिके तयार करणे आवश्यक असते. शास्त्रज्ञ जीएम पिकांना उपाय मानत आहेत. संशोधनानुसार ही पिके सामान्य पिकांपेक्षा जास्त उत्पादन देतातच, शिवाय तयार होण्यासही कमी वेळ लागतो. जीएम पीके बादलत्या वातावरणात तग धरु शकतात शिवाय विविध कीड रोगांना सहनशिल असतात, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्याचबरोबर जगभरात जीएम पिकांचा वापर होत असून खाद्यतेलात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताला अशा पिकांची गरज आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

जीएम पिकांना विरोध का?

जीएम पिकांना विरोध करणाऱ्यांचा पहिला युक्तिवाद असा आहे की, जीएम पिकांमुळे पीक उत्पादन वाढीचा खर्च वाढेल. कारण जीएम पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दरवेळी नविन बियाणे खरेदी करावे लागते. त्यामुळे पिकांमधील वैविध्य दूर होण्याची शक्यता असून, त्यामुळे जोखीम वाढेल, असे जीएम पिकाना विरोध करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. जीएमला विरोध करणाऱ्यांची सर्वात मोठी भीती म्हणजे या पिकांचे दुष्परिणाम सध्या तरी कळत नाहीत. कारण हे बाहेर येण्यासाठी काही वर्षे तसेच काही दशकांचा कालावधी लागू शकतो. त्याचबरोबर जनुकीय सुधारित पीके इतरही अनेक प्रकारे पर्यावरणावर परिणाम करू शकतात, उदाहरणार्थ मोहरीच्या फुलांचा मधमाश्यांशी थेट संबंध आहे, असेही एका अहवालात म्हटले आहे. पिकातील कोणताही बदल हा पर्यावरणाचा समतोल बिघडवू शकतो. मंजुरीपूर्वी जीएम पिकांवर संपूर्ण संशोधन करावे, अशी विरोधकांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com