Poultry Farming : कुक्कुटपालनासाठी सातपुडा, श्रीनिधी जातींची निवड

Poultry Business : कोंबडीच्या प्रत्येक जातीमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात. काही जातींचे संगोपन मांस तर काही जातींचे अंडी उत्पादनासाठी संगोपन केले जाते. यातूनच योग्य जातीची निवड करून व्यवसाय यशस्वी करता येईल.
Poultry Breeds
Poultry BreedsAgrowon

डॉ. ओम पवार, डॉ. दर्शना भैसारे,

डॉ. मुकुंद कदम, डॉ. हर्षल बोकडे

Poultry Breeds : कोंबडीच्या प्रत्येक जातीमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात. काही जातींचे संगोपन मांस तर काही जातींचे अंडी उत्पादनासाठी संगोपन केले जाते. देशभरातील विविध संशोधन संस्थांमध्ये अंडी आणि मांस उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने दोन जातींच्या संकरातून नवीन संकरित जाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून कुक्कुटपालनासाठी योग्य जातीची निवड करून व्यवसाय यशस्वी करता येईल.

कलिंगा ब्राउन

केंद्रीय कुक्कुट विकास संघटन, भुवनेश्‍वर या संस्थेने विकसित केलेली आहे.

ही जात व्हाइट लेघहॉर्न आणि रोड आइलैन्ड रेड यांचे संकर.

वार्षिक अंडी उत्पादन : २६२.

कॅरीब्रो धनराजा

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर (उ. प्रदेश) यांनी ही जात विकसित केली.

ही जात रंगीत पिसांच्या कोंबड्या म्हणून प्रसिद्ध आहे. हे पक्षी काटक असतात.

या कोबंड्यापासून मिळणारा नफा जास्त असतो.

सातव्या आठवड्यात हे पक्षी २ ते २.१५ किलोपर्यंत भरतात.

Poultry Breeds
Organic Farming : बुलडाण्यात जिल्हास्तरीय कार्यशाळेत सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन

नर्मदानिधी

पशुवैद्यकीय महाविद्यालय, जबलपूर या संस्थेने विकसित केलेली आहे.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी वाढविली जाते.

या जातीचे नर २० आठवड्यांत १.५ ते २ किलो तर मादी पक्षी १.३ ते १.७ किलो वजनापर्यंत वाढतात.

वार्षिक अंडी उत्पादन : १८१.

कावेरी

केंद्रीय कुक्कुट विकास संघटन, बंगलोर या संस्थेने विकसित केली आहे.

प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी वाढविली जाते.

मादीचे वजन २० आठवड्यांत १.६ किलोपर्यंत भरते. वार्षिक अंडी उत्पादन : १८०.

नंदनम चिकन १

तमिळनाडू पशू व प्राणी विज्ञान विद्यापीठ, चेन्नई या संस्थेद्वारे विकसित.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त.

या जातीचे पक्षी १२ आठवड्यांत १ किलो वजनापर्यंत वाढतात.

वार्षिक अंडी उत्पादन : १८०.

नंदनम चिकन २

तमिळनाडू पशू व प्राणी विज्ञान विद्यापीठ, चेन्नई या संस्थेने विकसित केली आहे.

प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी उपयुक्त.

या जातीचे नरपक्षी ८ आठवड्यांत १.४४ किलो वजनापर्यंत वाढतात.

खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता २.६६ इतकी असते.

नंदनम चिकन ४

तमिळनाडू पशू व प्राणी विज्ञान विद्यापीठ, चेन्नई या संस्थेने विकसित केली आहे.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त.

वार्षिक अंडी उत्पादन : २२५.

सातपुडा

ही जात यशवंत ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव या संस्थेद्वारे विकसित.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी संगोपन केले जाते.

या जातीचे नर २० आठवड्यांत १.४ किलो, तर मादी पक्षी १.१२ किलो वजनापर्यंत वाढतात.

वार्षिक अंडी उत्पादन : ११० ते १२०.

Poultry Breeds
Animal Care : जनावरांच्या जखमेतील अळ्यांसाठी प्रभावी उपचार

इंडब्रो ब्राउन लेअर

इंडब्रो रिसर्च व ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद या संस्थेद्वारे विकसित.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त.

या जातीचे पक्षी १.६५ किलो वजनापर्यंत वाढतात.

अंडी उत्पादन वय ः १४० दिवस.

वार्षिक अंडी उत्पादन ः ३०० ते ३२०.

श्रीनिधी

कुक्कुट संशोधन संचालनालय, हैदराबाद या संस्थेद्वारे विकसित.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त.

नराचे वजन २० आठवड्यांत २.४ किलोपर्यंत भरते.

अंडी उत्पादन वय : १६० दिवस.

वार्षिक अंडी उत्पादन : २२८

प्रतापधन

महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर, राजस्थान या संस्थेने विकसित केलेली आहे.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी संगोपन केले जाते.

जातीचे नर २० आठवड्यांत १.५ किलो, तर मादी पक्षी १.२ ते २.७ किलो वजनापर्यंत भरते.

अंडी उत्पादन वय : १७० दिवस.

वार्षिक अंडी उत्पादन : १६२.

कामरूपा

आसाम कृषी विद्यापीठ, गुवाहाटी या संस्थेद्वारे ही जात विकसित करण्यात आली आहे.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त.

या जातीचे नर ४० आठवड्यात २.४ किलो वजनापर्यंत भरतात.

वार्षिक अंडी उत्पादन : १३० ते १५०.

जर्सिम

बिरसा कृषी विद्यापीठ, रांची (झारखंड) या संस्थेने विकसित केली आहे.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त.

या जातीचे नरपक्षी १.६ ते १.८ किलो वजनापर्यंत वाढतात.

अंडी उत्पादन वय : १७५ ते १८० दिवस.

वार्षिक अंडी उत्पादन : १६५ ते १७०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com