Pocra 2 : पोकराचा दुसरा टप्पा राबण्यात येणार; राज्य सरकारच्या हालचाली सुरू

Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Project : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात २१ जिल्ह्याचा समावेश असून ६ हजार ९५९ गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच जागतिक बँकच्या आर्थिक मदतीने सहा हजार कोटी रुपयांच्या योजनाला मान्यता दिलेली आहे.
Pocra Implementation
Pocra ImplementationAgrowon
Published on
Updated on

; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या लेखाशिर्ष निर्मितीला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. लेखशीर्षला मान्यता दिल्यानंतर जागतिक बँककडून निधी मंजूर करण्यात येतो. राज्य सरकारला निधी प्राप्त झाल्यास त्याचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात २१ जिल्ह्याचा समावेश असून ६ हजार ९५९ गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच जागतिक बँकच्या आर्थिक मदतीने सहा हजार कोटी रुपयांच्या योजनाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे दुसरा टप्पा राबवण्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. परंतु आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमधील ६ हजार ९५९ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आहे.

राज्य सरकारने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आहे. बदलत्या हवामानात शेतकरी अडचणीला तोंड देत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि उत्पन्नात जोखीम वाढली आहे. त्यामुळे या बाबीचा विचार करूनच योजनेची आखणी केली जाणार आहेत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

Pocra Implementation
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी करार

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात शेतीविषयक नवे संशोधन, पाण्याचा काटेकोर वापर , शेतीमधील कर्ब नियंत्रण, कार्बन क्रेडिट सुविधा आदि बाबीचा समावेश करण्यात अॅला आहे. तसेच भरडधान्य उत्पादन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान अॅ बाबीवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com