Seasonable Vegetable Cultivation : हंगामनिहाय भाजीपाला लागवडीत राखले सातत्य

Cultivation of Vegetable Crops : गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे अप्पासाहेब बलभीम कोरके यांची सव्वाचार एकर शेती आहे. त्यात कांदा दोन एकर, ज्वारी एक एकर आणि एक एकरावर आलटून-पालटून भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.
Balbhim Korke
Balbhim KorkeAgrowon

शेतकरी नियोजन

भाजीपाला

शेतकरी : अप्पासाहेब बलभीम कोरके

गाव : गुळवंची, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर

एकूण क्षेत्र : सव्वाचार एकर

भाजीपाला क्षेत्र : एक एकर

गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे अप्पासाहेब बलभीम कोरके यांची सव्वाचार एकर शेती आहे. त्यात कांदा दोन एकर, ज्वारी एक एकर आणि एक एकरावर आलटून-पालटून भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गावापासून फक्त १० ते १२ किलोमीटर अंतरावर असल्याने भाजीपाला उत्पादनावर भर दिला आहे.

दरवर्षी एक एकर क्षेत्र राखीव ठेवत त्यात हंगामानुसार कोथिंबीर, चाकवत, मेथी, शेपू, पालक, चुका, तांदुळसा, अंबाडी इत्यादी भाज्यांची लागवड केली जाते. प्रत्येकी किमान ५ गुंठ्यांचे प्लॉट तयार करून भाजीपाला उत्पादन घेतले जाते.

Balbhim Korke
Vegetable Cultivation : कांदा, टोमॅटो, बटाटा लागवड क्षेत्रात घट

लागवड नियोजन

भाजीपाला पिकांना वर्षभर चांगली मागणी असते. त्यातही जून ते ऑगस्ट, त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर आणि फेब्रुवारी ते मे या कालावधीत उठाव आणि दर चांगला मिळतो. त्यानुसार अंदाज घेऊन महिनाभर आधीच लागवडीचे नियोजन केले जाते.

मार्च ते मे महिन्यादरम्यान बाजारात आवक कमी असते. त्यामुळे चांगला उठाव मिळून दरही मिळत असल्याने हा हंगाम महत्त्वाचा असतो.

Balbhim Korke
Vegetable Research : एकार्जुना येथे ३१ कोटींतून होणार भाजीपाल्यावर संशोधन

व्यवस्थापनातील बाबी

लागवडीसाठी जमिनीची मशागत करून ट्रॅक्टरच्या साह्याने सारे पाडून घेतले जातात. त्यानंतर दहा फूट अंतराचे वाफे तयार केले जातात.

पावसाळ्यात वाफ्यांची लांबी साधारण ५० फूट, तर उन्हाळ्यात १० फुटांपर्यंत ठेवली जाते. वाफ्यांमध्ये पावसाळ्यात बियाणे हाताने विस्कटून टाकले जाते. तर उन्हाळी हंगामात बियाणे वाफ्यामध्ये आडव्या रेषा ओढून टोकण पद्धतीने लावले जाते.

लागवडीनंतर पाणी दिले जाते. त्यानंतर दर आठ दिवसांनी वाफसा पाहून सिंचन केले जाते.

वातावरण बदल आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांचा अंदाज घेऊन रासायनिक फवारणी घेतली जाते.

मेथी असेल तर तीन आठवड्यात, कोथिंबीर, शेपू असेल तर पाच आठवड्यात तर चुका, पालक, अंबाडी आणि चाकवत लागवड असेल चार आठवड्यांत काढणीला येते.

पुढील दहा दिवसांचे नियोजन

सध्या तांदुळसा, अंबाडी, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करून १० दिवस झाले आहेत. पुढील आठ-दहा दिवसांत एक-दोन पाणी दिल्यानंतर साधारण पंधरवड्यात मेथी काढणीला येईल. त्यानंतर शेपू, कोंथिबीर, तांदुळसा, अंबाडी येईल. सध्या फक्त सिंचनावर भर दिला जाईल.

- अप्पासाहेब कोरके, ९५१८७३८५५३ (शब्दांकन : सुदर्शन सुतार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com