School
SchoolAgrowon

High Temprature : अमरावती जिल्ह्यात आजपासून सकाळी वाजणार शाळेची घंटा; तापमानवाढीचा फटका; शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Amravti News : जिल्ह्यात मार्च महिन्यातच उकाडा वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून (ता. २०) जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
Published on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravti School Timing : अमरावती ः जिल्ह्यात मार्च महिन्यातच उकाडा वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून (ता. २०) जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता दुपारऐवजी सकाळी साडेसातला शाळेची घंटा वाजणार आहे. या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले आहे.

हिवाळ्याच्या दिवसांत अनेक शाळा सकाळऐवजी दुपारच्या सत्रात भरविण्यात येत होत्या. साधारणपणे मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीला काही दिवस वातावरण फारसे तापले नव्हते. मात्र आता होळीनंतर तापमानात अचानक वाढ झाली आहे.

 School
High Temprature : सूर्याची भट्टी पेटली

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पंखे नाहीत, अनेक शाळांवर टिनाचे शेड आहे, पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था नाही, अशा परिस्थितीत शाळेला जाणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक अग्निदिव्य पार करण्यासारखे आहे. अनेक संघटनांनी शाळा दुपारऐवजी सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यांनी तर त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केली.

मात्र आता अमरावती जिल्ह्यात २० मार्चपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने तसे आदेश काढले असून प्राथमिक शिक्षण विभागाकडून येत्या दोन दिवसांत आदेश निघण्याची शक्यता आहे.

वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या सत्रात शाळा घेणे विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरत नाही. त्यामुळे २० मार्चपासून सर्व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- प्रिया देशमुख,

शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com