Pune APMC
Pune APMC Agrowon

Pune APMC Scam : पुणे बाजार समितीमध्ये पार्किंग टेंडरमध्ये घोटाळा

Parking Tender Scam : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंग टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार तीन संचालकांनी पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
Published on

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंग टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार तीन संचालकांनी पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. या तक्रारीनुसार बाजार समितीचे ३२ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. याची चौकशी करण्याची मागणी संचालकांनी केली आहे.

तसेच, बाजार समितीने नियमबाह्य पद्धतीने दिलेले विविध ठेके आणि अनियमित ठेकेदारांचे पार्किंग ठेके तातडीने रद्द करून ई-निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद आणि नानासाहेब आबनावे यांनी केली आहे.

Pune APMC
Pune APMC : पार्किंगचा ठेका ऐकाला, बेकायदा वसुली करतोय भलताच

बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील जुन्या बटाटा शेडच्या शेजारील मोकळ्या जागेवर वाहनतळ चालविण्याच्या कामाचा ठेका ज्या कंपनीला दिला आहे, ते कंपनीचे ठेकेदार पार्किंग ठेक्याची रक्कम वेळेत भरत नाही.

तसेच हे ठेकेदार नेमून दिलेल्या पार्किंगच्या जागा सोडून इतर ठिकाणचे पार्किंगचे शुल्कदेखील जमा करीत आहेत. हा बाजार समितीसोबत केलेल्या करारनाम्यामधील अटी-शर्तींचा भंग आहे. त्यामुळे या कंपनीला देण्यात आलेला पार्किंगचा ठेका रद्द करून नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्य बाजार आवारातील गेट क्र.१ च्या लगत वजनकाट्यामागील रिकाम्या जागेत (दुचाकी, मोटार कार) वाहनतळाचा ठेका बाजार समितीने ई-निविदा प्रक्रिया राबवून दिलेला होता. त्यावेळी वार्षिक ठेका ६२ लाख ७२ हजार रुपयांना दिला होता. या वाहनतळामधून बाजार समितीला १० महिन्यांमध्ये केवळ ३० लाख ५६ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये अतिक्रमणांचा बाजार

या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांवर १६ लाख ४ हजार रुपये खर्च झाला आहे. मागील ई-निविदेनुसार या वाहनतळामध्ये १० महिन्यांत बाजार समितीला ५२ लाख २६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. तसे न होता मागील दहा महिन्यांत ३७ लाख ७४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

मुख्य प्रवेशद्वारासमोरील ट्रक पार्किंग सुमारे साडेतीन एकर जागेला ३७ लाख ३७ हजार भाडे आहे. तर बटाटा शेड जवळील साधारणतः चार एकर जागेला २२ लाख रुपये भाडे आकारले जात आहे. बटाटा शेडजवळील जागा जास्त असूनदेखील कमी भाडे आकारले जात आहे. बाजार समितीने अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ठेके दिले आहेत. यामुळे बाजार समितीचे वर्षाला कोट्यवधींचे नुकसान होत आहे. याबाबत पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दिली आहे.
- सुदर्शन चौधरी, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
बाजार समितीची ई-निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. ई-निविदा रक्कम ठरल्यानंतर नुकसानीबाबतची चौकशी केली जाईल.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com