Pune APMC
Pune APMC Agrowon

Pune APMC : पार्किंगचा ठेका ऐकाला, बेकायदा वसुली करतोय भलताच

APMC Parking Contract : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसागणिक नवनवीन गैरव्यवहार समोर येत आहे.
Published on

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसागणिक नवनवीन गैरव्यवहार समोर येत आहे. लोकनियुक्त संचालक मंडळ नियुक्त झाल्यापासून ठेकेदारीत अडकलेल्या संचालकांनी आपल्या समर्थकांच्या सोयीसाठी विविध ठेके सुरू केले असून, त्याद्वारे राजरोस लूट सुरू आहे. बनावट पावती पुस्तक प्रकरणाचा तपास गुलदस्तात असताना, आता पार्किंगचे नियमबाह्य पैसे वसूल केल्याचे प्रकरण समोर आले असून, याबाबत संचालकांनी एकमेकांकडे बोट करून, मौन साधले आहे.

संचालक मंडळ नियुक्तीनंतर विविध जागांवरील पार्किंगचे ठेके संचालकांच्या समर्थकांत वाटून देण्यात आले. यासाठी विविध टेंडरची खिरापत वाटण्यात आली. यामध्ये आता बाजार समितीशी संबंध नसलेल्या ठेकेदाराकडून वाहनचालकांना पावती न देता रोख व आता थेट गुगल पेवर मनमानी पद्धतीने २००, ३०० ते ५०० रुपयांची वसुली केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमधील गैरप्रकार विधानसभेत गाजणार

याबाबत एका वाहन चालकाकडून तीन दिवसांत १ हजार ६०० रुपये घेतले, मात्र पावती दिली नसल्याचे समोर आले आहे. नांदेड सिटी येथील एक भाजीपाला खरेदीदार केळीची पाने खरेदी करण्यासाठी गेल्यावर त्यांनी आपला टेम्पो पेट्रोल पंपालगत लावला.

या टेम्पोला पार्किंगच्या नावाखाली तीनवेळा ३०० रुपये, तर कधी ५०० रुपये असे रोखीत पैसे घेतले. तर दोनवेळा २०० रुपये गुगल पेवर घेतले. अशा प्रकारे दीड महिन्यात संबंधित टेम्पोचालकाकडून १६०० रुपये घेतले. मात्र, पावती मागूनही पावती देण्यात आली नसल्याचे टेम्पोचालकाने सांगितले.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये अतिक्रमणांचा बाजार

या जागेचा ठेका ज्या कंपनीला दिला असल्याचे बाजार समिती सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले, मात्र प्रत्यक्षात गुगल पे करताना अन्य ठिकाणी पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ‘ठेका ऐकाला आणि वसुली करतोय भलताच’ हे समोर आले आहे. याबाबत संबंधित ठेकेदार कोण आहे याची माहिती घेतली जाईल. तसेच त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुरक्षा व अतिक्रमण विभागाला दिले असल्याचे डॉ. धोंडकर यांनी सांगितले.

बनावट पावती पुस्तक तपास गुलदस्तात

एकाच क्रमांकाच्या दोन पावत्यांवर बाजार शुल्क आणि पार्किंग शुल्क वसूल केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, याची लेखी तक्रार संबंधित ठेकेदाराच्या नावासह बाजार समिती प्रशासनाने मार्केट यार्ड पोलिस स्थानकात दिली आहे. मात्र या तक्रारीचा पाठपुरावा बाजार समितीने केला नसल्याचे समोर आले आहे. तर पोलिसांनी देखील या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com