Agriculture Department : ‘एसएओं’च्या तत्परतेने शासनाचीवर्षाला वीस लाखांची बचत

Agriculture Officers : नांदेड शहरातील नवा मोंढा भागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय २००५ पासून भाड्याच्या जागेत आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Nanded News : नांदेड शहरातील नवा मोंढा भागात मागील वीस वर्षांपासून खासगी जागेत भाडेतत्त्वावर असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्माचे प्रकल्प संचालक कार्यालय तसेच नांदेड तालुका कृषी अधिकारी कार्यालय एप्रिल महिन्यापासून नवीन कोठा भागातील शासनाच्या जागेत जात आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शासकीय जागा मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पाठपुरावा करुन इमारत मिळविल्याने शासनाची वर्षाला तब्बल वीस लाख रुपयांची बचत होणार आहे. नांदेड शहरातील नवा मोंढा भागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय २००५ पासून भाड्याच्या जागेत आहे.

Agriculture Department
Agriculture Department : बदल्यांच्या कथित घोटाळ्याची लोकायुक्त घेणार सुनावणी

यासोबतच नांदेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयही खुशालसिंहनगर कमानीजवळ खासगी जागेत आहे. यासाठी शासनाला दरवर्षी अठरा लाख रुपये भाडे द्यावे लागते. यात दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेता, एप्रिलपासून या कार्यालयाच्या भाड्यापोटी वीस लाख रुपये शासनाला द्यावे लागणार होते.

नवा मोंढा भागातील कार्यालयाच्या भाड्यात आगामी एप्रिल महिन्यापासून होणारी भरघोस वाढ लक्षात घेता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे शासकीय जागेबाबत विचारणा केली.

यास जिल्हाधिकाऱ्यांनीही तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद देत नवीन कोठा भागात महसूल भवनातील इमारत सुचविली. यामुळे भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी इमारतीची पाहणी केली. याच ठिकाणी वन विभागाने नुकतेच कार्यालय सुरू केले आहे. त्याच्या बाजूलाच कोविडच्या काळात उभारलेली पाच मजली इमारत रखवालदाराच्या प्रतीक्षेत होती. ही इमारत वापरात नसल्याने यातील अनेक उपकरने गायब झाली होती. तर तळमजल्यात रिकामटेकड्यांनी दगडाच्या चुली मांडून जेवणावळी उठवल्याचे दिसून आले.

Agriculture Department
Agriculture Department : लाखभर वेतन मिळतानाही शेतकरी सेवेत कुचराई नको

ही इमारत कृषी भवन म्हणून निवडण्याचे श्री बऱ्हाटे यांनी ठरवून महसूल विभागाकडून सोपस्कार पूर्ण करून घेतले. नव्या जागेबाबत आत्माचे प्रकल्प संचालक व नांदेड तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही अवगत करून आपापली कार्यालये सोडण्याचे सांगितले.

यामुळे ता. एक एप्रिलपासून नवीन कोठा भागातील शासकीय महसूल इमारतीत कृषीची सर्वच महत्त्वाची कार्यालये स्थलांतरित होत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या तत्परतेमुळे इमारत भाड्यापोटी शासनाचे वर्षाला वीस लाख रुपयांची बचत यातून होणार आहे.

कृषी विभागातील महत्त्वाची कार्यालये एकत्रित आली तर शेतकऱ्यांच्या सोईचे होईल, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासकीय इमारत उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक कार्यालय आणि नांदेड तालुका कृषी अधिकारी कार्यालय सुरू होतील.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com