Ujani Dam : ‘उजनी’तून मुख्य कालव्याला २१०० क्युसेक पाणी सोडले

Dam Water Update : पुणे जिल्ह्याकडून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे, त्यामुळे धरणाची पाणी पातळी काहीशी स्थिर आहे. पण पुढे भीमा नदीसह मुख्य कालवा आणि बोगद्याला मात्र पाणी सोडणे सुरूच आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Solapur News : पुणे जिल्ह्याकडून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे, त्यामुळे धरणाची पाणी पातळी काहीशी स्थिर आहे. पण पुढे भीमा नदीसह मुख्य कालवा आणि बोगद्याला मात्र पाणी सोडणे सुरूच आहे. मुख्य कालव्याच्या पाण्यात सोमवारी (ता. १२) पुन्हा १०० क्युसेकने वाढ करण्यात आली. आधी ते २००० क्युसेकपर्यंत सोडण्यात येत होते.

मागच्या माहिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तिकडील अतिरिक्त पाणी उजनी धरणात सोडण्यात येत आहे. पण धरणाची पाणी पातळी शंभर टक्क्यांच्यावर गेल्याने पुढे भीमा नदीसह कालवा आणि बोगद्याला पाणी सोडून पाणी पातळी नियंत्रित करण्यात येत आहे.

Ujani Dam
Ujani Dam : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे उजनी १०० टक्के भरले

मुख्य कालव्याला आधी २००० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते, त्यात आणखी १०० क्युसेकची वाढ करण्यात आली. त्याशिवाय बोगद्याला ९०० क्युसेक, दहिगाव योजनेला २१० क्युसेक, दहिगाव योजनेला ८० क्युसेक आणि वीजनिर्मितीला १६०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते.

Ujani Dam
Ujani Dam : उजनी धरणात तासाला १२ मेगावॅट विजनिर्मीती, ५ दिवसात १५ लाख युनिट वीज तयार

तर भीमा नदीत १२ हजार ३५० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. पण गेल्या आठ दिवसांपासून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सातत्याने कमी करण्यात येत आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रणात आली, आता विसर्गात पुन्हा एकदा घट कऱण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

उपयुक्त साठा ५६.८१ टीएमसी

उजनी धरणामध्ये सोमवारी (ता. १२) ४९७.१०० मीटरपर्यंत पाणी पातळी राहिली. तर पाण्याचा एकूण साठा १२०.४७ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ५६.८१ टीएमसी राहिला. तर या पाण्याची टक्केवारी १०६.४ टक्के राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com