Satara Water Scheme : सातारकरांना पाणी मिळण्यास उशीर झाला; आमदार शिंवेंद्रसिंहराजेची टीका

Narendra Modi : देशाचे पंतप्रधान आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सोलापुरमधून सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाल्या पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन केले.
Udayanraje Shivendrasinghraje
Udayanraje ShivendrasinghrajeAgrowon

Satara News : अमृत २.० योजनेंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साताऱ्यातील कास धरण पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन झाले. मात्र, सातारकरांना पाणी मिळण्यास उशीर झाल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या (साविआ) केली आहे. साविआच्या विलंबामुळे योजना वेळेत सुरू झाली नसल्याची टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.

देशाचे पंतप्रधान आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सोलापुरमधून सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाल्या पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन केले.

Udayanraje Shivendrasinghraje
Water Supply Scheme : नगरमधील पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत अफरातफर

यावेळी सातारा नगर पालिकेत साविआचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले, नगरविकास आघाडीचे प्रमुख आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

या योजनेमुळे सातारा शहरासह त्रिशंकू भागाला कास योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने ही योजना पूर्ण करू शकलो यांचे समाधान असल्याचे उदयनराजेंनी यांनी यावेळी म्हटले.

Udayanraje Shivendrasinghraje
Water Supply Scheme : योजनांच्या वीजबिलात सवलत अथवा माफी द्यावी : थोरात

या योजनेमुळे सातारा शहरासह त्रिशंकू भागाला कास योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने ही योजना पूर्ण करू शकलो यांचे समाधान असल्याचे उदयनराजेंनी यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, उदयनराजे यांच्या सत्तेत असणाऱ्या साविआवर शिवेंद्रराजे यांनी टीक केली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी साविआने विलंब केल्यामुळे सातारकरांना पाणी मिळण्यास उशीर झाला, असे शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे. नगर पालिकेतील नगर सेवकांच्या कार्यकाळात हे काम पूर्ण झाले नाही. नगरसेवक माजी झाल्यानंतर हे काम पूर्ण होत आहे, हे दुर्दैवी गोष्ट आहे, अशी टीका त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com