
Amaravati News : जिल्ह्यात पेरणीची गती वाढत असली तरी पीककर्जाची गती मात्र मंद आहे. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत लक्ष्यांकाच्या तुलनेत ६८ टक्के कर्ज वितरण झाले असून, त्यासाठी केवळ ३५ टक्के शेतकरी पात्र ठरविण्यात आले आहेत. ६४ टक्के शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यासाठी बॅंकांनी गती वाढविलेली नाही.
खरीप हंगाम २०२५-२६ साठी जिल्हा बॅंकिंग समितीने अमरावती जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्या २.२५ लाख शेतकऱ्यांसाठी १६५० कोटी रुपयांचे लक्ष्यांक निर्धारित केले आहे. एक एप्रिलपासून कर्ज वितरणास प्रारंभ झाला आहे.
कर्जमाफीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी गत हंगामातील कर्जाची परतफेड केली नसल्याने ते थकबाकीदार ठरले आहेत. तर बॅंकिंग समितीने सव्वादोन लाख शेतकरी पीककर्जासाठी पात्र ठरविलेत. यातील ७९ हजार ८२१ शेतकऱ्यांनी १११५.९५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
लक्ष्यांकाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण ६८ टक्के, तर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे. गत पंधरवड्यात कर्ज वितरणाचे प्रमाण ६० टक्के होते. त्यामध्ये केवळ आठ टक्के वाढ झाली आहे.
जिल्हा मध्यवर्तीचे कर्ज वितरण अधिक
राष्ट्रीय, खासगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पीककर्जाचे वितरण करते. यंदा या बॅंकांना एकत्रित लक्ष्यांक १६५० कोटी रुपयांचे आहे. राष्ट्रीय बॅंकेने लक्ष्यांकापैकी ६२ टक्के, खासगी बॅंकांनी १६ टक्के, ग्रामीण बॅंकांनी ५१ टक्के वितरण केले आहे. कर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ८३ टक्के कर्ज वितरण केले आहे.
सीबिल नाही, बोजा तपासणी
कर्ज देताना सीबिल स्कोर तपासण्यावर निर्बंध आल्याने बॅंकांनी आता शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा तपासून कर्ज देण्याची पद्धत अवलंबली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शेतीचे एकापेक्षा अधिक पट्टे आहेत व त्यावर बोजा आहे. परतफेड केली नसल्यास त्याला नवीन कर्जासाठी अपात्र ठरविण्यात येत आहे.
दृष्टिक्षेपात कर्ज वितरण (कोटी रुपये)
बॅंक लक्ष्यांक पात्र सभासद
(एकूण सभासद) प्रत्यक्ष वितरण
राष्ट्रीय ७४९ ३१,०३०(८७,१००) ४६२.८६
खासगी १०४ ९४४ ( १०,४००) २१.२४
ग्रामीण २१ ७७४ ( २१००) १०.६४
जिल्हा बॅंक ७५० ४७,०७३ (१,२५,०००) ६२१.२१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.