
Nanded News : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी ५ वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिलावर्ग व खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणाचे फेरवाटप करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १ जुलै रोजी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.
ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आरक्षण हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाअंतर्गत वेळोवेळी फेरवाटपाने निश्चित केले जाते. यावर्षी २०२५-३० या पंचवार्षिक कालावधीसाठी नव्याने आरक्षण निश्चित करण्यासाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालयांमध्ये सोडत पद्धतीने आरक्षण ठरवले जाणार आहे.
या प्रक्रियेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण कायम ठेवण्यात येणार असून अनुसूचित जाती व जमातींसाठीही संविधानानुसार आरक्षण निश्चित केले जाईल. या सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणार आहे.
शासनाकडून नांदेड जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेले सरपंचपदांचे आरक्षण तालुकानिहाय सोडत कार्यक्रमासंदर्भातील मंगळवारी (ता. २४) जारी झालेल्या अधिसूचनेअंतर्गत निर्देशित करण्यात आले आहे.
या आदेशान्वये नियुक्ती केलेल्या निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम १९६४ अंतर्गत नियम २ नुसार तालुकास्तरीय आरक्षण निश्चित करण्यासाठी तालुकानिहाय निवडणूक अधिकारी यांनी विधाने प्राधिकृत करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीवेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी सकाळी दहा वाजता संबंधित तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय आरक्षण सोडत
नांदेड (तहसील कार्यालय, नांदेड), अर्धापूर (तहसील कार्यालय, अर्धापूर), भोकर (तहसील कार्यालय, भोकर), मुखेड (तहसील कार्यालय, मुखेड), हदगाव (हदगाव तहसील कार्यालय, हदगाव), कंधार (तहसील कार्यालय, कंधार), हिमायतनगर (तहसील कार्यालय, हिमायतनगर), लोहा (तहसील कार्यालय, लोहा), नायगाव (तहसील कार्यालय, नायगाव), देगलूर (तहसील कार्यालय, देगलूर), बिलोली (तहसील कार्यालय, बिलोली), धर्माबाद (तहसील कार्यालय, धर्माबाद), किनवट (तहसील कार्यालय, किनवट), माहूर (तहसील कार्यालय, माहूर), उमरी (तहसील कार्यालय, उमरी) व मुखेड (तहसील कार्यालय, मुखेड).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.