Sugar Factory : संजय साखर कारखान्याच्या कामगारांची मंगळवारी बैठक

बैठकीला जास्तीत जास्त कर्मचारी-कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार प्रतिनिधींनी केले आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Dhule Sugar Factory : विजयनगर (ता. धुळे) येथील अवसायनात गेलेल्या संजय सहकारी साखर कारखान्याची (Sanjay Cooperative Sugar Factory) मालमत्ता विक्री करून कामगारांचे देणे अदा करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

या पार्श्‍वभूमीवर निर्णायक चर्चा करण्यासाठी कारखान्याच्या कर्मचारी-कामगारांची तातडीची बैठक २१ फेब्रुवारीला सकाळी अकराला कारखाना साइटवर होणार आहे.

बैठकीला जास्तीत जास्त कर्मचारी-कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार प्रतिनिधींनी केले आहे.

कारखान्याची मालमत्ता विक्रीच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर १२ फेब्रुवारीला संजय सहकारी साखर कारखाना विजयनगर (पो. नवलनगर, ता. धुळे) येथे कारखाना वसाहतीमध्ये धुळे व परिसरातील कर्मचारी-कामगारांची बैठक झाली. बैठकीत सर्वानुमते पुढील वाटचाल व कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

Sugar Factory
Kranti Sugar Factory : क्रांती साखर कारखाना ठरला सर्वोत्कृष्ट

दरम्यान, कारखान्याची मालमत्ता विक्री झाल्यास येणाऱ्या रकमेतून कामगारांचे थकीत पगार, ग्रॅच्युइटी, पीएफ मिळणे, तसेच १९९५ पासून कारखाना बंद झाल्यानंतर आजतागायत कर्मचारी वसाहतीमध्ये आपले येणे कधी ना कधी मिळेल या अपेक्षेने बरेच कर्मचारी वसाहतीत थांबून आहेत.

या कर्मचाऱ्यांबाबत निर्णायक चर्चा करण्यासाठी परिसरातील सर्व कामगारांना २१ फेब्रुवारीला बैठकीसाठी उपस्थित राहावे. त्या वेळी आधारकार्ड सोबत आणावे, असे आवाहन कामगार प्रतिनिधी डी. सी. पाटील, डी. व्ही. पाटील, पी. व्ही. दीक्षित, डी. एस. पुरी, पी. जी. भामरे, एन. ए. पाटील, बी. के. पाटील, एस. व्ही. पाटील आदींनी केले.

अधिक माहितीसाठी डी. सी. पाटील (मो. ९३५९४१४४६७), श्री. पुरी (मो. ७०२०८८८४९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com