Water Resources Department : वाढीव दहा वक्राकार दरवाजांना हिरवा कंदील

Flood Condition : पूरस्थितीने बाधित होणाऱ्या गोदाकाठच्या गावांसाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूरमध्येश्‍वर धरणांवरील दहा वक्राकार दरवाजांना हिरवा कंदील दिला आहे.
Flood
Flood Agrowon

Nashik News : पूरस्थितीने बाधित होणाऱ्या गोदाकाठच्या गावांसाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूरमध्येश्‍वर धरणांवरील दहा वक्राकार दरवाजांना हिरवा कंदील दिला आहे. जलसंपदा विभागाने तब्बल २२७ कोटी रुपये कामासाठी मंजूर केले आहेत.

निधी उपलब्ध होऊन शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. येत्या दीड वर्षात हे काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. नांदूरमध्यमेश्‍वर धरणांवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Flood
Water Resources Department : ‘मेरी’ मुख्य अभियंता कार्यालयाला ‘जलसंपदा’चा राज्य पुरस्कार जाहीर

‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, कार्यकारी अभियंता सोनल सहाणे उपस्थित होते.आमदार बनकर म्हणाले, की २००४ मध्ये आमदार असताना, नांदूरमध्येश्‍वर धरणावर ६८ कोटी रुपयांतून आठ वक्राकार दरवाजा बसविल्याने पुराची तीव्रता कमी झाली होती. पुराचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दुसऱ्यांदा आमदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार वर्षांत ३० हून अधिक बैठका मंत्रालयात घेतल्या.

नवीन दरवाज्यांमुळे पुराचा पूर्ण धोका टळणार आहे. यासह धरणालगत विश्रामगृह, भोजनालय व परिसर विकासासाठी तीन कोटी मंजूर झाले आहेत. वृक्षसंवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी २७ कोटींचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करणार आहे. रस्ते, पूल, शासकीय इमारतींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असल्याचे ते म्हणाले.

Flood
Department of Water Resources : शेतकरी आणखी खोलात जाणार, १३०० रूपये पाणीपट्टी भरावे लागणार १३ हजार

दहा दरवाजे ठरणार वरदान

इंग्रज राजवटीतील व उभारणीला १०० वर्षे पूर्ण झालेल्या नांदूरमध्यमेश्‍वर धरणाचे रूप खऱ्या अर्थाने पालटणार आहे. जल प्रकल्प खरतर परिसराला वरदान ठरतात, पण नांदुूमध्यमेश्‍वर धरण पावसाळ्यात रौद्ररूप घेऊन फुगवट्याचे पाणी २० हून अधिक गावातील शेत व घरांमध्ये थरकाप उडवायचे.

पूर्वीचे आठ व नव्याने दहा दरवाजे बसविले जाणार असल्याने सव्वादोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. १२ मीटर उंची व आठ मीटर रूंदी आकाराचे दहा वक्राकार दरवाजे पूरस्थिती इतिहास जमा करणार असून, धरणाला नवा लूक देणारे व परिसराला वरदान ठरतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com