Farmer Demand: बदलत्या हवामानाचा फटका सांगोला तालुक्यातील आंबा व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी किरण वाघमोडे यांनी केली आहे..यंदा तालुक्यात आंबा पिकाला विक्रमी मोहोर आला होता. मात्र धुके, वाढलेली उष्णता आणि वातावरणातील अनियमित बदलांमुळे मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून पडला. तसेच झाडांवर राहिलेल्या आंब्यालाही तीव्र उष्णतेमुळे गळती लागून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे..Maize Crop Loss: चिखलीत मक्याच्या कणसांत दाणेच भरले नाहीत.दुसरीकडे, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या शेवगा पिकालाही मोठा फटका बसला आहे. शेवग्याची फुले करपल्याने उत्पादन घटले असून, अनेक ठिकाणी हे पीक वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे..या पार्श्वभूमीवर आंबा व शेवगा पिकांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत किरण वाघमोडे यांनी आमदार बाबासाहेब देशमुख, तालुका कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.