Sangli Water Issue : सांगलीकरांसाठी पाणीबाणी; कोयनेतून विसर्ग केला कमी, शेती पिके वाळण्याची भिती

Sangli Drought : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
Sangli Water Issue
Sangli Water Issueagrowon

Maharashtra Drought : मागच्या महाराष्ट्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्याला सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाण्याची सोय केली जाते परंतु सातारा जिल्ह्यातील कमी पाऊस पडल्याने कोयनेचा पाणीसाठी पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. यामुळे सांगली जिल्ह्यात पाण्याची सध्या तीव्र समस्या जाणवू लागली आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही अपुरे पर्जन्यमान होते. परिणामी कोयना धरण भरले नसल्याने धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. पण, याच कोयना धरणावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत.

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३,१०० क्यूसेक पाणी सांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. तर धरणात सध्या ४२ टीएमसी पाणीसाठा आहे.

Sangli Water Issue
Shaktipeeth Highway Sangli : जनावरांचे गोठे बनले जिल्हाधिकारी कार्यालय, 'शक्तिपीठ' विरोधात शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

तसेच काही गावांची तहानही धरणातील पाण्यावरच भागते. तर धरणातील पाण्याची सर्वाधिक तरतूद ही सांगल जिल्ह्यासाठी आहे. यावर सांगलीतील प्रमुख तीन सिंचन योजना अवलंबून आहेत. गेल्यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिर्त निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात येत आहे.

गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून हे पार्ण मागणीनुसार सोडले जाते. त्यातच् मागील आठवड्यातच सांगर्ल पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठ पाण्याची मागणी वाढली होती त्यामुळे कोयना धरणाचे विमोचकः द्वारमधील विसर्ग वाढविण्यात आल होता. सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी एकूण ३,३०० क्यूसेकः पाणी सोडण्यात येत होते. मात्र गुरुवारी सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी कमी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com