
Sangali News : सांगली ः जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी, मध्यम आणि लघू प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ६२ टक्के इतका पाणीसाठा होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ४ हजार ३० दशलक्ष घनफट म्हणजे ५१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गतमहिन्याच्या तुलनेत अकरा टक्क्यांनी पाणीसाठा घटला आहे.
जिल्ह्यात पाच मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ९ हजरा ४४० दशलक्ष घनफूट आहे. गतवर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये ८३ प्रकल्पांत २८ टक्के इतका पाणीसाठा होता. अर्थात दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पावसाने दडी
मारली होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व भागांत गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे पाणीसाठा वाढला असून फारशी पाणी टंचाई भासली नाही. नोव्हेंबर महिन्यात ८१ टक्के तर
जानेवारी महिन्यात ६३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. अर्थात डिसेंबरमध्ये १८ टक्क्यांनी पाणीसाठा घटला. गेल्या काही दिवसांपासून जत, कवेठमहंकाळ, तासगाव, आटपाडी
या तालुक्यात पाणी टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत ४३ तर लघू प्रकल्पांत ५४ टक्के इतका पाणीसाठा आहे. ८३ प्रकल्पांत ५ हजार ३२६ दशलक्ष घनफूट एकूण पाणीसाठा असून त्यापैकी ४ हजार ३० दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जत तालुक्यात २७ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात सर्वांत कमी म्हणजे २९ टक्के पाणीसाठा आहे. २७ प्रकल्पांपैकी ७ प्रकल्पांत मृतपाणीसाठा, दोन प्रकल्प कोरडे आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रकल्पांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)
तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
तासगाव ७ ४११.०३ ७३
खानापूर ८ ४०.३.५३ ७४
कडेगाव ७ ३६६.५७ ५८
शिराळा ५ ५७९.०० ६६
आटपाडी १३७१० ९७ ६१
जत २७ ८५१.९० २९
कवठेमहांकाळ ११ ५८६.२० ७०
मिरज ३ १०१.२० ८४
वाळवा २ १९.६० ४१
एकूण ८३ ४०३०.०० ५१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.