Sugarcane Cultivation : ऊस लागवडीची गती सांगली जिल्ह्यात संथ

Sugarcane Farming : सांगली जिल्ह्यात पुढील वर्षी गाळपाला जाणाऱ्या उसाची लागवड ४५ हजार ६८६ हेक्टरवर झाली आहे. त्यापैकी आडसाली हंगामातील २९ हजार ४९९ हेक्टवर ऊस लागवड झाली आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात पुढील वर्षी गाळपाला जाणाऱ्या उसाची लागवड ४५ हजार ६८६ हेक्टरवर झाली आहे. त्यापैकी आडसाली हंगामातील २९ हजार ४९९ हेक्टवर ऊस लागवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊस लागवडीला फारशी गती आली नाही. त्यामुळे ऊस लागवड संथगतीने सुरू आहे.

जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर आहे. त्यापैकी डिसेंबरच्या मध्यापर्यंत ४५ हजार ६८६ हेक्टरवर लागवड झाली आहे. आडसाली ऊस लागवडीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे आडसाली हंगामात २९ हजार ४९९ हेक्टरवर उसाची लागवड झाली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केले आहे. परंतु, अद्याप बहुतांश शेतकऱ्यांनी आडसाली हंगामाची नोंद केली नाही. त्यामुळे जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये आडसाली हंगामातील उसाची किती क्षेत्रावर लागवड झाली आहे, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : सांगलीत ३८ हजार हेक्टरवर ऊस लागवड

दुष्काळी जत, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यांत पूर्व हंगामातील ऊस लागवडीचे नियोजन शेतकरी करू लागला आहे. पूर्व हंगामातील १५ हजार २०० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. मात्र, या भागाता अजूनही ऊस लागवडीस फारशी गती आली नसल्याचे चित्र आहे. पलूस तालुक्यात ९९० हेक्टवर खोडव्याची नोंद झाली आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : बियाण्यांअभावी ऊस लागण रखडली

सुरू हंगामातील ऊस लागवडीचा कालावधी डिसेंबरपासून सुरुवात होते. या हंगामातील उसाच्या लागवडीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. ऊस रोपवाटिकेत रोपांची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकरी ऊस रोपे तयार झाल्यानंतर ऊस लागवड करण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता आहे. सुरू हंगामातील ऊस लागवड साधारण फेब्रुवारी महिन्याअखेर संपली जाते.

तालुकानिहाय ऊस लागवड दृष्टिक्षेप तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज ७,५२५

जत २१९

खानापूर ४,१०५

वाळवा ११,०७२

तासगाव ४,३०२

शिराळा ३,२२१

आटपाडी ५२७

कवठेमहांकाळ १३३

पलूस ६,८२९

कडेगाव ७,७५६

एकूण ४५,६८६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com