Sugarcane Cultivation : सांगलीत ३८ हजार हेक्टरवर ऊस लागवड

Sugarcane Season 2024 : आडसाली हंगामत २९ हजार ४४३ तर पूर्व हंगामातील ८५८७ हेक्टर असे एकूण ३८ हजार १३० हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Sugarcane cultivation
Sugarcane cultivationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात आडसाली हंगामातील ऊसलागवड आटोपली असून पूर्व हंगामातील लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. आडसाली हंगामत २९ हजार ४४३ तर पूर्व हंगामातील ८५८७ हेक्टर असे एकूण ३८ हजार १३० हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा पावसामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवड करण्यास उशिरा प्रारंभ झाला. त्यामुळे आडसाली हंगामातील उसाच्या क्षेत्रात घट होईल, असा सध्यातरी प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Sugarcane cultivation
Sugarcane Cultivation : आडसाली ऊस लागवडीला पावसाचा फटका

यंदाच्या हंगामात आडसाली उसाची २९ हजार ४४३ हेक्टरवर लागवड झाली आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ऊसलागवड झाली आहे. आडसाली ऊस पीक फुटवा अवस्थेत आहे. तर अनेक ठिकाणी भरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली असल्याचे चित्र आहे.

Sugarcane cultivation
Sugarcane Cultivation : बियाण्यांअभावी ऊस लागण रखडली

दरम्यान, सप्टेंबरमध्येही पाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३० हजार २३८ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती. त्यानंतर ऊस लागवडीला फारशी गती आली नाही. जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ३८ हजार १३० हेक्टरवर उसलागवड झाली आहे. अर्थात एका महिन्यात ७ हजार ८९२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली.

जिल्ह्यात आजअखेर पू्र्व हंगामात ८ हजार ५८७ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यातील मिरज, जत, खानापूर, आटपाडी, शिराळा, पलुस आणि कडेगाव या तालुक्यात पूर्व हंगामातील ऊसलागवड सुरू आहे.

सध्या शेतकऱ्यांनी पूर्व हंगामातील ऊसलागवड करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पूर्व हंगामातील ऊस लागवडीस येत्या पंधरा ते वीस दिवसांत गती येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com