Sangli DCC Bank
Sangli DCC BankAgrowon

Sangli DCC Bank : मृत शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा बँकेच्या वसुली नोटिसा

Debt Recovery : जिल्हा बॅंकेकडून कर्जे घेऊन मृत झालेल्या ५ हजार ४९७ शेतकऱ्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे.
Published on

Sangli News : जिल्हा बॅंकेकडून कर्जे घेऊन मृत झालेल्या ५ हजार ४९७ शेतकऱ्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्याकडे ५२ कोटी रुपये थकित आहेत.

थकबाकीदार ५९ हजार शेतकऱ्यांपैकी ४० हजार जणांनाही नोटिसा बजावल्या आहेत. बँक प्रशासन मृतांच्या वारसांचे पत्ते शोधून नोटिसा बजावत आहे. आतापर्यंत ३२५ मृत वारसांना नोटिसा दिल्या असून ७० लाख रुपये वसूलही झाले आहेत.

जिल्हा बॅंकेकडून ‘एनपीए’ कमी करण्यासह विक्रमी म्हणजे अडीचशे कोटी रुपये ढोबळ नफ्यासाठी आतापासूनच थकबाकी वसुलीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून बड्या नेत्यांच्या संबंधित पाच सूतगिरण्यांसाठी लिलाव नोटिसा काढल्या आहेत. त्याचबरोबर मृत शेतकऱ्यांसह थकबाकीदार शेतकऱ्यांनाही १०१ च्या नोटिसा बजावल्या जात आहेत.

Sangli DCC Bank
Sangli DCC Bank : थकबाकीदार शेतकरी, संस्थांसाठी ‘ओटीएस’ योजना

जिल्हा बॅंक, विकास सेवा सोसायट्यांच्या मदतीने कर्जवाटप करते. ५ हजार ४९७ कर्जदार मृत आहेत. त्यांच्याकडील ५२ कोटी रुपये थकित वसुलीसाठी फारसे कोणी प्रयत्नच करीत नव्हते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या वारसांना नोटीस देण्याचा निर्णय झाला असून अंमलबजावणी केली जात आहे. त्यांचे मृतांचे वारस शोधून नोटिसा दिल्या जात आहेत.

त्यासाठी बॅंक कर्मचारी, प्रसंगी तलाठी, ग्रामसेवक यांच्याशीही संपर्क साधत आहेत. त्यांच्या वारसांची नोंदही आता बॅंक कर्मचारीच करीत आहेत. राहत्या घरावर वारसांची नावे लावली असतील तर जमिनीच्या ७/१२ वर नावे लावून त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत.

Sangli DCC Bank
Sangli DCC Bank : थकबाकी वसुलीसाठी सांगली जिल्हा बॅंकेची मोहीम

...तर संचालक मंडळ बरखास्तीची शिफारस

जिल्ह्यातील ५९ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यातील ४० हजार जणांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विकास सेवा सोसायट्यांकडून नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यातील अनेक गावच्या सोसायटीचे संचालक नोटिसांसाठी राजी नाहीत.

सोसायट्यांचे सचिव मात्र नोटिसांसाठी आग्रही आहेत. नोटिसांचा विषय संचालकांच्या मासिक बैठकीत अंतिम करूनच निर्णय घ्यावा, असाही विचार अनेक संस्थांमध्ये आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात हयगय करणाऱ्या संस्थांचे संचालक मंडळ बरखास्तीची शिफारस जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे बॅंक प्रशासनाने केली आहे.

थकबाकी वसुलीसाठी कायद्याने जे काही करायला हवे, त्यासाठी आग्रही आहोत. ज्या संस्था थकबाकीदारांना नोटिसा देणार नाहीत, त्यांचे संचालक मंडळ बरखास्तीची शिफारस सहकार उपनिबंधकांकडे करीत आहे. संबंधित संस्थांवर प्रशासक नेमताना आमचे मत घेता, मग आमच्या उद्देशानुसार कार्यवाही होत नसेल तर संचालक मंडळ बरखास्तीबाबत शिफारशीचा बॅंक प्रशासनाला अधिकार आहे.
- शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅंक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com