Sangli District Bank : सांगली जिल्हा बँकेवरून राजकारण तापलं, विरोधकांना अध्यक्षांचे प्रत्त्यूत्तर

Sadabhau Khot : सांगली जिल्हा बँकेच्या कारभारावर बोट ठेवत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी मोर्चा काढला.
Sangli District Bank
Sangli District Bankagrowon

Sangli District Bank Politics : सांगली जिल्हा बँकेच्या कारभारावर बोट ठेवत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी मोर्चा काढला होता. यावर बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी मोर्चात केलेल्या आरोपांचे खंडण करत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. अध्यक्ष नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधत बँकेला विनाकारण बदनाम करून अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे ते म्हणाले.

‘‘आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बॅंकेवर काढलेला मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला आहे. बॅंकेच्या कारभारावर सभासद, शेतकरी, ठेवीदार कामगार खूष आहेत. जिल्हा बँकेची मोर्चेकऱ्यांना एसटी कर्मचारी बँक करायची आहे का,’’ असा प्रश्‍न जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला.

जिल्हा बँकेवर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार नाईक बोलत होते ‘‘आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ पाटील यांनी एसटी कामगारांचे आंदोलन केले. त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सहकार्याने त्यांनी एसटी कर्मचारी बँकेवर पॅनेल उभा करून निवडून आणले. बँकेचा अनुभव नसल्याने चुकीच्या धोरणामुळे एसटी बँकेतील ७० टक्के ठेवी कमी झाल्या. बँक अडचणीत आली.

कर्मचाऱ्यांचे पगारही करणे शक्य होईना. त्यामुळे त्यांच्या बाजूने निवडून आलेले १५ संचालकांनी गट बदलला. ते इंटक काँग्रेस संघटनेत सहभागी झाले. असा त्यांच्या बँक कारभाराचा अनुभव आहे. आता त्यांनी जिल्हा बँकेची एसटी कर्मचारी बँक करण्याचा विचार आहे काय, हे पाहावे लागेल.

जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालकांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत प्रगतीची आकडेवारी सर्वांसमोर आहे. विश्‍वासार्हता, पारदर्शी कारभारामुळेच या कालावधीत एक हजार कोटींनी ठेवी वाढल्यात. शंभर रुपयांची ठेव ठेवतानाही एनपीएसह सर्वच बाबतीत प्रगती झालेली आहे.’’

Sangli District Bank
Kolhapur Sangli Flood : धास्ती महापुराची! जागतिक बँकेच्या पथकाची आपत्ती व्यवस्थापन विभागाला अचानक भेट, अधिकाऱ्यांकडून सूचना

आमदार नाईक म्हणाले, ‘‘बँकेची प्रगती त्यांना पाहावत नाही. ज्यांच्या कारभारावर ते बोलत आहेत, त्यांतील काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्याबाबत मीच तक्रार केलेली होती. ज्यांच्याकडे लोकमत नाही, त्यांना आता बँकेत प्रवेश करायचा आहे. त्यासाठी त्यांनी बँकेवर प्रशासक नेमून मागच्या दाराने प्रशासकीय मंडळावर यावयाचे आहे.’’

‘शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नास ५० हजार देणार’

आमदार नाईक म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तातडीने ५० हजार रुपये अल्प व्याजात देण्याचे धोरण जिल्हा बँकेने घेतलेले आहे. त्यांची तातडीने अंमलबजावणी करीत आहे. त्यासाठीची तरतूद बँकेच्या नफ्यातून केली जात आहे. जिल्ह्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना आम्ही पीक कर्जेही तोटा सहन करून देत आहोत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com