
Sangli News : जिल्हा बॅंकेची शेती कर्जाची वसुलीची जोरात वसुली आहे. जूनअखेर पीककर्ज वसुली ९० टक्के उद्दिष्ट देण्यात आले आहे. मेअखेर ६७ टक्के कर्ज वसुली झाली असून, तीन आठवड्यांत २३ ते २५ टक्के वसुलीचे आव्हान अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर आहे.
जिल्हा बँकेच्या शेती कर्जाच्या वसुलीची मुदत जूनअखेरपर्यंत असते. बॅँकेने शेती कर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम २३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. यातील चालू कर्ज १८८२ कोटी ७४ लाख व थकबाकी ४८९ कोटी ५७ लाख रुपये आहे. मेअखेर चालू व थकबाकी मिळून १४९५ कोटी ६४ लाख रुपये वसूल झाले आहेत.
एकूण वसूल पात्र रकमेच्या ६७ टक्के वसुली झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी शेती कर्जाच्या वसुलीसाठी ९० टक्के उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार वसुलीचे नियोजन सुरू आहे.
प्रत्येक तालुक्यातील जिल्हा बँकेच्या मुख्यालयातून अधिकाऱ्यांचे विशेष वसुली पथक पाठवली आहेत. शिवाय थकबाकीदारांवर १०१ व अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वसुलीचा टक्का वाढत आहे. जूनअखेर आणखीन २२ ते २५ टक्के कर्ज वसुलीचे आव्हान बँकेसमोर आहे.
तालुकानिहाय वसुली...
जिल्हा बँकेची मेअखेरची पीककर्ज वसुली तालुकानिहाय अशी - कडेगाव -१४७.१७ कोटी, वाळवा - २२५.०१ कोटी, आटपाडी - १०८.५६ कोटी, खानापूर - ८४.५७ कोटी, शिराळा - ७५.८७ कोटी, पलूस - ११०.७१ कोटी, मिरज - २०८.५३ कोटी, कवठे महांकाळ - १३०.६० कोटी, तासगाव १८०.७२ कोटी, जत - २१५.७० कोटी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.