Water Crisis : मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील नागरिकांनी मांडल्या पाण्याच्या अडचणी

Water Scarcity : आपल्या विभागातील ज्या गावात सातत्याने टँकर लागतात तिथे पाणीपुरवठा योजनेबाबतचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. पिण्यासाठी ठेवण्यात आलेला राखीव पाणीसाठ्याबाबत दक्षता घ्यावी.
Water Crisis Planning
Water Crisis PlanningAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : ‘‘संवाद मराठवाड्याशी’’ हा उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. २३) ऑनलाइन वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला. या वेळी सहभागी आठही जिल्ह्यांतील नागरिकांनी पाण्याच्या अडचणी मांडल्या.

या वेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विजय कोळी, उपस्थित होते. वेबिनारमध्ये संबंधित जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी झाले. या वेळी विभागातील आठही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील टंचाई स्थिती व उपाययोजनाबाबत माहिती दिली.\

अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, यांनी पाणीटंचाई बाबत शासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, की आपल्या भागात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

Water Crisis Planning
Parbhani Water Crisis : परभणी जिल्ह्यातील सहा लघु तलाव कोरडे

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करताना कमी कालावधीच्या व दीर्घकालीन अशा दोन्ही उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे. नागरिकांनी मांडलेल्या पाणीटंचाईच्या अडचणी प्राधान्याने सोडवा. ज्या गावात टँकरची मागणी आहे तिथे प्राधान्याने प्रशासनाने टँकर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. आपल्या विभागातील ज्या गावात सातत्याने टँकर लागतात तिथे पाणीपुरवठा योजनेबाबतचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. पिण्यासाठी ठेवण्यात आलेला राखीव पाणीसाठ्याबाबत दक्षता घ्यावी.

Water Crisis Planning
Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीटंचाईचे संकट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आगामी कालावधीत आपल्या योजना गतीने पूर्ण केल्या तर टँकर व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासणार नाही, असेही ते म्हणाले. याबाबत विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेने सोडवून याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

...या अडचणी आल्या पुढे

संवादात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून ओमकेश यांनी जलजीवन मिशनच्या कामातील अडचणी, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून मारोती बनसोडे यांनी पाइपलाइनची गळती, नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून संदीप वानखेडे यांनी गावातील अवैध पाणी वापर, बीड शहरातून डी. जी. तांदळे यांनी बीड शहर पाणीपुरवठा योजनेतील अडचणी, एन-7 सिडको छत्रपती संभाजीनगर येथून प्रणीत वाणी यांनी पाणीपुरवठ्यातील अडचणी, लातूर येथून अरविंद शिंदे यांनी खासगी टँकर बाबतच्या अडचणी मांडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com