Maharashtra Transport Development: समृद्धी महामार्ग नवीन वाढवण बंदराला जोडणार

Devendra Fadnavis: समृद्धी महामार्ग केवळ एक रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. हा महामार्ग वाढवण बंदराशी देखील जोडला जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Nashik News: महायुती सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर समृद्धी महामार्गाचे स्वप्न बघितले होते, त्याची आज पूर्तता होत आहे. हा समृद्धी महामार्ग केवळ एक रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. हा महामार्ग वाढवण बंदराशी देखील जोडला जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्याच्या इगतपुरी ते आमणे (भिवंडी) या ७६ किमी दरम्यानच्या मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता.५) पार पडले.

Devendra Fadnavis
Agriculture Development: कार्यालयात बसून शेतकरी, शेती विकास योजना होणार नाहीत: शिवराजसिंह चौहान

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री दादा भुसे, नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार किसन कथोरे, सरोज अहिरे, निरंजन डावखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, आमदार नितीन पवार, हिरामण खोसकर आदींची उपस्थिती होती.

Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis: कापलेल्या पिकांच्या नुकसानीच्या मदतीचा विचार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की समृद्धीची नांदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम या मार्गाच्या माध्यमातून होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की या महामार्गालगत ३३ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक असा हा समृद्धी महामार्ग असणार आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की नवीन प्रकल्पांमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. इंधन बचत होईल.

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

जवळपास ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्च करून ७०१ किलोमीटरचा हा महामार्ग.

वन्यजीवांसाठी ८ ओव्हरपास व ९२ अंडरपास. ३२ मुख्य पूल, ३१७ लहान पूल. रस्त्यांच्या लगत शहरे व गावांसाठी ५९ ओव्हरपास २२९ अंडरपास.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com