- संपत मोरे
आपण कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावातील मुख्य चौकात सायंकाळी सहा साडे सहा वाजता असाल तर आपाल्याला एक दृश्य दिसतं आणि आपण त्या दृश्यातील व्यक्तीची चौकशी करायला लागतो. दृश्य अस असतं. एक जीपगाडी चालवत एक साठीकडं झुकलेली स्त्री आपल्यासमोरून जाते.
आता आपण शहरात चारचाकी गाड्या चालवणाऱ्या स्त्रिया पहातो. त्यात काही विशेष वाटत नाही पण जेव्हा तुम्ही रेठरे गावी गाडी चालवणाऱ्या स्त्रीला बघता तेव्हा ते आश्चर्य वाटतं आणि मग त्याच आश्चर्यातून जर तुम्ही कोणाला विचारलं तर तुम्हाला माहिती मिळते.
माहिती सांगणारा अगदी सहजपणे सांगतो, "अहो, त्या नूतनवैनी हायेत. जीपच काय घेऊन बसलात. त्या बैलगाडीबी चालवत्यात आणि ट्रॅक्टरबी."अस सांगत तो माणूस अभिमानाने त्यांची गोष्ट आपल्याला सांगायला लागतो. नूतन मोहिते या जेव्हा लग्न होऊन सासरी आल्या तेव्हा त्यांनाही कधी वाटलं नव्हतं आपल्याला शेतीत प्रत्यक्ष काम करावं लागेल. पण त्यांचे सासरे आबासाहेब मोहिते यांचं निधन झालं.
त्यांच्या निधनानंतर शेतीचा सगळा भार त्यांच्या पतीवर पडला. पतीची एकट्याने शेती करताना धावपळ व्हायला लागली. मग एक दिवस पतीला साथ द्यायचा निर्धार करत त्यांची पावले रानाच्या दिशेने पडली. माहेरी असल्या कामाची सवय नव्हती. पण समृद्ध भूतकाळाचा विचार न करता समृद्ध भविष्यकाळ निर्माण करायला त्यांनी परिश्रम घ्यायला सुरुवात केली. अनेकदा प्रतिकूल परिस्थिती आली पण त्यावर त्यांनी मात केली. शेतीत काम करताना ऊन वारा पाऊस यांची पर्वा करायची नसते. दिवस रात्रही बघायची नसते.
त्या सांगतात,"अनेकदा लहान बाळाला कडेवर घेऊन मी शेतात पाणी पाजायला गेले आहे." शेतीतील कामाची कसलीही ओळख नसताना त्यांनी सगळी काम शिकून घेतली.शेतीत नवीन प्रयोग केले. चांगले उत्पन्न मिळवले.अगोदर बैलाने शेती केली. नंतर ट्रकटर घेतला. शेतीसाठी जी कौशल्य शिकावी लागतील ती त्यांनी शिकून घेतली.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नूतनवैनी फक्त ट्रॅकटर आणि जीप चालवतात अस नाही त्या संगणकही शिकल्या आहेत. शेतात भांगलण करण्यापासूनची सगळी काम त्यांना महत्वाची वाटतात. कष्टाला पर्याय नाही हे त्यांचं तत्वज्ञान आहे.त्यांच्या शेतीतील कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.