Cooperative Election : बुलडाण्यात शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग निवडणुकीत समता पॅनेलची बाजी

बुलडाणा तालुक्यातील धामणगाव बढे येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक नुकतीच झाली असून यात समता पॅनेलचे सात, तर एकता परिवर्तन पॅनलचे चार सदस्य विजयी झाले.
 Election
ElectionAgrowon

Buldana Election News : बुलडाणा तालुक्यातील धामणगाव बढे येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक (Farmers Cooperative Ginning Pressing Organization Election) नुकतीच झाली असून यात समता पॅनेलचे सात, तर एकता परिवर्तन पॅनलचे चार सदस्य विजयी झाले. त्यामुळे या निवडणुकीत समता पॅनेलने बाजी मारली आहे.

 Election
Crop Loan : वर्ध्यात ६९ हजार शेतकऱ्यांना ९३१ कोटींचे कर्ज

या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रविशंकर मोदे यांच्या नेतृत्वात समता पॅनेल व शिवसेना तालुका प्रमुख रामदास चौथनकर यांच्या नेतृत्वात एकता परिवर्तन पॅनेल यांच्यामध्ये लढत होती. दरम्यान, तीन उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज त्रुटीमुळे बाद झाले होते.

तर, एका उमेदवाराच्या विरोधातील अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती.

विजयी उमेदवारांमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष अविनाश मोदे, वसंता घोंगडे, मगनसिंग नाईक, गफ्फार पटेल, आनंदा क्षीरसागर, नारायण हिवाळे, शेख नशीर शेख इमाम, कुमिदबाई गवळी, गजानन गोरे, अंजनाबाई गोरे, संगीता शहाणे यांचा समावेश आहे. निर्णय अधिकारी म्हणून जी. जे. आमले यांनी कामकाज पाहिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com