Cotton Seed
Cotton SeedAgrowon

Fake Cotton Seed: एचटीबीटीसह कापसाच्या बोगस बियाण्यांची विक्री

HTBT Seed Scam: तस्करीच्या बियाण्यांसोबत विविध वाणांच्या नावे छापील रिकाम्या पाकिटातून कापसाच्या बोगस बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत पेरणीनंतर बियाणे न उगवण्याची शक्यता अधिक आहे.
Published on

Amravati News: तस्करीच्या बियाण्यांसोबत विविध वाणांच्या नावे छापील रिकाम्या पाकिटातून कापसाच्या बोगस बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत पेरणीनंतर बियाणे न उगवण्याची शक्यता अधिक आहे. तथापि या बियाण्यांसोबत शेतकरी कंपनीचेही बियाणे पेरत असल्याने संभाव्य आक्षेपांची धास्ती उत्पादक कंपनी व विक्रेत्यांनी घेतली आहे.

अमरावती जिल्ह्यात यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी अंदाजित करण्यात आली आहे. बियाणे बाजारात सर्वच नामांकित कंपनीचे वाण उपलब्ध असले तरी विशिष्ट वाण वगळता इतर वाणांना मागणी कमी असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सत्तर टक्के क्षेत्रात चोरबीटीची पेरणी होऊ लागली आहे. तस्करीने हे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. कृषी विभागाने कारवाई करीत ४३ लाख रुपये किमतीचे ४ हजार २४१ पाकिटे जप्त केली आहेत. यासोबतच भरारी पथकाला रिकामी छापील पाकिटे सापडली आहेत.

Cotton Seed
HTBT Cotton Seeds: ‘एचटीबीटी’चे गुजरात कनेक्शन

ती पाकिटे नेमकी कुठे तयार झाली व त्याचा वापर कुठे कुठे केला गेला, हे अद्याप समोर आलेले नाही. तथापि कृषी केंद्रांमधून यंदा तणनाशक व बियाण्यांना लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कीड लागू नये, यासाठी या औषधांची मागणी केली जाते. १० ते २० लिटर औषध मागण्यात आल्याने ही मागणी संशयास्पद असून रिकाम्या पाकिटांतून बोगस बियाण्यांची औषध लावून विक्री केली गेली आहे.

चोरबीटीसोबत कंपनीच्या वाणांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. दर वर्षीपेक्षा या मागणीत घट झाल्याचे दिसून आले आहे. चोरबीटी किंवा बोगस बियाण्यांसोबत खरेदी करण्यात आलेल्या वाणांची पेरणी केली जात आहे. बोगस बियाणे न उगवल्यास त्याचा थेट आक्षेप कंपनीच्या वाणांवर येण्याची शक्यता आहे. याची उत्पादक कंपनी व विक्रेत्यांनी धास्ती घेतली आहे.

Cotton Seed
HTBT Cotton Seeds: बाजारपेठेत एचटीबीटी कापूस बियाण्याचा धुमाकूळ

रिकामी पाकिटे, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट

तस्करीच्या एचटीबीटी बियाण्यासोबत छापील रिकामी पाकिटे आल्याने त्यामध्ये बोगस बियाणे भरून विक्री झाली असल्याची भीती वर्तविण्यात आली आहे. एचटीबीटीच्या नावाखाली ही विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या कारवाईत एचटीबीटीच्या पाकिटांसह पोत्यातूनही खुले बियाणे जप्त करण्यात आले आहे. याचाच अर्थ रिकाम्या पाकिटांत बोगस बियाणे भरून विक्री झाली असून त्याच्या उगवणक्षमतेबद्दल संशय आहे.

शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर ते बियाणे उगवले नाही, तर त्याचा थेट आक्षेप विक्रेत्यांनी विकलेल्या कंपनीच्या वाणांवर येण्याची भीती आहे. कृषी विभाग व यंत्रणा शेतकऱ्यांनी घेतलेले आक्षेप ग्राह्य मानते. त्यामुळे उत्पादक कंपनी व विक्रेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
प्रवीण उंबरकर, गायत्री कृषिसेवा केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com