

Jalna News : अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (Ambad Agriculture Produce Market Committee Election) सहाय्यक निबंधक कार्यालयात नामनिर्देशनपत्र विक्रीला सोमवारी(ता. २७) पासून सुरवात झाली.
पहिल्या दिवशी दोन तर दुसऱ्या दिवशी तीन अर्ज व बुधवारी (ता. २९) ला ९२ अर्जाची मिळून एकूण ९७ अर्जाची विक्री करण्यात आली असल्याचे सहाय्यक निबंधक परेश बेरा यांनी सांगितले.
अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक निवडून द्यावयाचे आहे. यामुळे अर्जाची विक्री जास्त होणार असल्याचे चित्र आहे.
यामुळे १८ जागेसाठी किती नामनिर्देशनपत्र दाखल होतात हे चित्र सोमवारी (ता. ३) स्पष्ट होणार असले तरी शेवटी नामनिर्देशनपत्र छाननी व उमेदवारी माघारी घेण्यापर्यंत किती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे पाहावे लागणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच अनेक अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
अनेक पक्ष एकमेकांशी युती करण्याची चाचपणी करत आहे. यामुळे आता कोणाची युती कोणाबरोबर होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.त्यातच जागा वाटपावरून एकमत होणे महत्त्वाचे आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविणाऱ्या सर्वसाधारण उमेदवारांना पाच हजार रुपये तर राखीवसाठी एक हजार रुपये प्रत्येक उमेदवारांना डिपॉझिट भरावे लागणार आहे. तर अर्जाची विक्री दोनशे रुपयाप्रमाणे सुरू आहे.
अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गत अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांचे वर्चस्व आहे. त्यांचा जुना अंबड मतदारसंघ व घनसावंगी मतदार संघातील चार जिल्हा परिषद गटाचा यामध्ये समावेश आहे.
त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी व ग्रामपंचायत, सोसायट्या यांची संख्या मोठी आहे. यामुळे उमेदवारी मागणाराची संख्या मोठी आहे.
दुसरीकडे बदनापूर विधान सभेचे आमदार यांच्या मतदार संघातील तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटाचा व अंबड शहराचा समावेश आहे. याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे.
ऐन वेळेस कसे समीकरण व जुळवा,जुळव होणार यावर सर्व गणित अवलंबून अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढविण्यासाठी सर्वच पक्ष पुढे सरसावले असले तरी ऐनवेळेस निवडणुकीत कसे समीकरण जुळणार, कोण कोणाबरोबर जाणार यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.