Sugarcane Sets : पाडेगाव ऊस संशोधन केंद्रात १५०१२ ऊस बियाणे विक्री सुरू

Padegaon Sugarcane Research : पाडेगाव संशोधन केंद्राने ६६ एकर क्षेत्रावर विविध ऊस वाणांचे मुलभूत बियाणे मळे तयार केले आहेत.
Padegaon Sugarcane Research Center
Padegaon Sugarcane Research Center Agrowon
Published on
Updated on

Satara News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभूत ऊस बियाणे विक्रीचा प्रारंभ करण्यात आला.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख, ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांचे हस्ते सतीश काकडे (निंबूत), धोंडीबा दाईगुंडे (सोलापूर), अनिल जमदाडे (वाई), नामदेव सकुंडे (वाघळवाडी) या प्रगतिशील शेतकऱ्यांना फुले ऊस १५०१२ या वाणाच्या बेणेमळ्यातील पहिली मोळी देऊन बियाणे विक्री प्रारंभ करण्यात आला.

Padegaon Sugarcane Research Center
Sugarcane seeds : पाडेगाव ऊस केंद्रात मिळणार दर्जेदार ऊस बेणे

पाडेगाव संशोधन केंद्राने ६६ एकर क्षेत्रावर विविध ऊस वाणांचे मुलभूत बियाणे मळे तयार केले आहेत. उसाच्या मुलभूत बियाण्यांपासून कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत बेणे मळे तयार करून शेतकऱ्यांना बेणेपुरवठा करण्यात येतो.

Padegaon Sugarcane Research Center
Sugarcane Seed : पूर्वहंगामी लागण करणाऱ्यांना निम्म्या किमतीत ऊस बियाणे

सध्या प्रामुख्याने २०२२ मध्ये या संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेली फुले ऊस १५०१२ आणि राष्ट्रीय स्तरावर द्विकल्पीय उष्णकटिबंधीय प्रदेशामधील सात राज्यांसाठी प्रसारित झालेली फुले ऊस १३००७ या वाणाचे मोठ्या प्रमाणावर मुलभूत बियाणे मळे केंद्रामार्फत तयार केले आहेत.

पाणी टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारित केलेली फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ ही वाण पाण्याचा ताण सहन करणारी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com