Safed Musli : सीमावर्ती भागात सफेद मुसळीला प्राधान्य

Safed Musli Farming : आदिवासी भागातील शेतकरी प्रामुख्याने जिरायती पिके घेतात. याशिवाय रानभाज्यांच्या उत्पादनातूनही त्यांना अतिरिक्त उत्पादन मिळत असते.
Safed MUsli
Safed MUsliAgrowon
Published on
Updated on

Nashik News : आदिवासी भागातील शेतकरी प्रामुख्याने जिरायती पिके घेतात. याशिवाय रानभाज्यांच्या उत्पादनातूनही त्यांना अतिरिक्त उत्पादन मिळत असते. मात्र अलीकडेच या भागातील शेतकऱ्यांनी कंदवर्गीय रानभाजी म्हणून ओळखले जाणाऱ्या सफेद मुसळी, अर्थात बोलीभाषेतील कवळीची भाजी लागवडीकडे वळत आहेत. त्यामुळे पीक पद्धतीत बदल करून नव्या संधी शेतकरी निर्माण करत आहेत.

सध्या वनक्षेत्रातून सफेद मुसळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र बाजारातील मागणी ओळखून महाराष्ट्र व गुजरातच्या सीमा भागातील सुरगाणा तालुक्यातील शेतकरी या लागवडीकडे प्राधान्य देत आहेत. जूनमध्ये पहिल्या पावसात शेवळा, दीहगडी, लोत, तेरा, कवळीची भाजी (सफेद मुसळी) अशा भाज्या सुरवातीला आढळतात.

Safed MUsli
Agriculture News : महाडमध्ये शेती पडीक

मात्र सध्या नामशेष होत चाललेली सफेद मुसळीकडे कोरडवाहू शेतकरी पुन्हा वळू लागले आहेत. गुजरात सीमावर्ती भागात म्हैसखडक, दोडीपाडा, उंबरठाण, चुली, शिवपाडा, देवीपाडा, दरापाडा, वडपाडा, फणसपाडा, चुली, बेहुडणे, राशा, बोरचोंड, वांगण, करंजुल, मांधा, रघतविहीर, चिंचमाळ, बर्डा, गाळबारी, पिंपळसोंड, कोठुळा, काठीपाडा सुळे, विजयनगर, पालविहीर या गावांतील शेतकरी सफेद मुसळी लागवडीकडे वळले आहेत.

...अशी आहे लागवडीची पद्धत

शेतकरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात माळरानावर किंवा भात खाचरात उताराच्या जागेवर भुसभुशीत गादी वाफे करून रताळी, हळद, अळू लागवडीसारख्या एका सरळ रेषेत लागवड करतात. पावसाचे प्रमाण वाढले तर कंद कुजून खराब होतात. ऑक्टोबर महिन्यात काढणीला सुरुवात केली जाते.

Safed MUsli
Agriculture Sowing : पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या

सफेद मुसळी उच्च मूल्यांचे औषधी गुणधर्माची वनस्पती आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासह भाजीतून विविध प्रथिने, लोह, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. पावसाचे घटते प्रमाण पारंपरिक भात शेतीपेक्षा अधिक उत्पन्न देणारी बाब म्हणून भात उत्पादक शेतकरी आता सफेद मुसळी लागवडीकडे कल वाढला आहे.

...असे असतात दर

गुजरात, महाराष्ट्र सीमावर्ती भागात सुरगाणा, उंबरठाण तसेच गुजरात राज्यातील बिलदा, धरमपूर भागात १२०० पासून २४०० रुपये प्रति किलो वाळलेल्या कंदाला भाव मिळतो. लागवडीसाठी बियाणे विकत घ्यायचे असेल, तर ओले बियाणे प्रतिकिलो ५०० रुपये दराने मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com