
Pune News: कोट्यवधी रुपयांच्या बाजार शुल्क (सेस) चोरीचे रॅकेट राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सक्रिय असल्याची चर्चा असताना, आता मुंबई (वाशी) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेस चोरी उघड झाली आहे. या प्रकरणी बाजार समितीच्या भरारी पथकाने आयात करण्यात आलेल्या सुमारे २०० कंटेनरमधील तुरीवर १ कोटी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने २६ लाख रुपये आगाऊ न्यायालयात भरून, मगच सुनावणी पणन संचालकांकडे घेण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई बाजार समितीच्या दक्षता पथकाने काही दिवसांपूर्वी आयात करण्यात आलेले तुरीचे २०० कंटेनर पकडले होते. या प्रकरणात आयातदाराने कोणतेही बाजार शुल्क भरले नसल्याचे समोर आल्यानंतर बाजार समितीने तुरीच्या बाजारमूल्यावर सेस आणि दंडात्मक कारवाई म्हणून १ कोटी ११ लाख रुपये भरण्याचे आदेश आयातदाराला दिले होते.
याप्रकरणी आयातदाराने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयात बुधवारी (ता. २) सुनावणी झाली. यात न्यायालयाने याचिका फेटाळत, दंडाचे आगाऊ २६ लाख रुपये न्यायालयात भरण्याबरोबरच, पणन संचालकांकडे अपिलाचे आदेश दिले आहेत.
सचिव डॉ. पी. एल. खंडागळे म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शेतीमाल साठविण्यासाठी किंवा व्यवहारासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. बाजार समिती किंवा पणन संचालनालयाचा परवाना न घेता तूर आयात केली जात होती. यावर बाजार समितीने दंडात्मक कारवाई केली. यावर आयातदाराने मुंबई उच्च न्यायलायात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळत, दंडाचे २६ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निकालाची प्रत बाजार समितीला अद्याप प्राप्त झाली नसून, आदेशाच्या प्रतिनुसार पुढील कारवाई केली जाईल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.