Pune Market Cess Scam: पुणे बाजार समितीमधील सेसचोरीवर शिक्कामोर्तब

APMC Fraud: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून बाजार शुल्क म्हणजेच सेसची चोरी उघडकीस आली असून, एका अडत्याकडून तब्बल ८ लाखांची रक्कम थकवण्यात आली आहे.
Pune Market Committee
Pune Market CommitteeAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे बाजार समितीमध्ये बाजार शुल्क (सेस) लपवालपवी आणि चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा असताना, मात्र आता सेस चोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. नुकत्याच सुरू केलेल्या दफ्तर तपासणीमध्ये फळ विभागातील एका व्यापाऱ्याच्या दफ्तर तपासणीमध्ये ८ लाखांची सेस चोरी उघड झाली आहे. एकाच अडत्याकडे एवढ्या मोठी चोरी उघड झाल्याने सेस चोरीचा आकडा काही कोटींमध्ये असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

बाजार समिती प्रशासनाने फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि भुसार विभागातील अडत्यांच्या दफ्तरांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये विविध अडत्यांचे दप्तर देखील ताब्यात घेतले आहेत. त्यातील फळबाजारातील गाळा नंबर ४७७ यांची दफ्तर तपासणी पूर्ण झाली असून, सेसमध्ये ६ लाख २१ हजार १५७ रुपयांचा फरक निघाला आहे.

Pune Market Committee
Mumbai Market Cess Scam: बाजार समिती प्रशासनच सेस चोरीला जबाबदार

या फरकावर २५ टक्के दंड १ लाख ५५ हजार २८९ रुपये आणि १८ टक्के जीएसटी २७ हजार ९५२ रुपये मिळून एकूण ८ लाख ४ हजार ३८९ रुपयांचा फरक निघाला. ती रक्कम भरण्याची नोटीस संबंधित गाळाधारकास देण्यात आली आहे, अशी माहिती बाजार समितीचे फळ, भाजीपाला विभागप्रमुख प्रशांत गोते यांनी दिली.

Pune Market Committee
Market Committee Cess Scam: मामला सेस चोरीचा!

अडत्यांकडून शेतकरी, खरेदीदारांची कोट्यवधींची लूट झाल्याचे समोर आल्यानंतर सेसचोरी देखील होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. बाजार समिती प्रशासनाने नुकतेच एका अडत्याचे दफ्तर उचलून एक वर्ष व्यवहाराची तपासणी केली असता त्याच्याकडे ८ लाख ४ हजार ३८९ रुपयांची सेसचोरी पकडली आहे. त्यामुळे सेसचोरी करणाऱ्या अडत्यांचे धाबे दणाणले असून दफ्तर तपासणी कारवाईला जोर येण्याची शक्यता आहे.

त्या अडत्यांचा अहवाल गुलदस्तात

अडत्यांनी शेतकरी, खरेदीदार यांची फसवणूक केलेल्या प्रकारानंतर तीन वर्षांपूर्वी पुणे बाजार समितीने आजवर सुमारे ८० अडत्यांपैकी आजपर्यंत झालेल्या दफ्तर तपासणीत सुमारे ३६ अडते दोषी आढळले होते. मात्र तीन वर्षांत केवळ १९ अडत्यांना अंतिम नोटिसा बजावल्या असून, उर्वरित अडत्यांच्या अहवाल गुलदस्तात आहेत. त्यामुळे त्या दफ्तर तपासणीचे नक्की काय झाले, असा सवाल उपस्थित झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com