Kolhapur Drought Condition : पाणीदार जिल्ह्यातील अनेक गावात नद्या झाल्या कोरड्या, शेतकरी ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता

Kolhapur Rivers : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
Kolhapur Drought Condition
Kolhapur Drought Conditionagrowon

Kolhapur Drought River : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत नदीला पाणी नसल्याने नद्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीसच कोरडे पडले आहे. दरम्यान दत्तवाडसह घोसरवाड, दानवाड, टाकळीवाडी आदी गावांतील महिला, नागरिक व शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

घरातील गरजेसाठी व पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी नागरिक महिलांना विहिरी, कूपनलिका आदींचा आधार घ्यावा लागत आहे. पुढचे काही दिवस अशीच परिस्थीती राहिल्यास ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आहे. दुधगंगा नदी पात्रात पाणी नसल्याने अनेक गावांची अशीच स्थिती होण्याची शक्यता आहे.

उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ग्रामपंचायतीने मोठा खड्डा काढून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र ती जेमतेम एक दिवस चालली. जूनपर्यंत दत्तवाडसह पंचक्रोशीत तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. दूधगंगा नदीकाठची अशी अवस्था असताना इचलकरंजीला पाणी दिल्यास काय परिस्थिती होईल याची चर्चा या परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व महिलांत सुरू आहे.

सध्या ऊस तुटून गेल्यानंतर अनेकशेतकऱ्यांनी लागवडी टाकून खोडवा उसाचे संगोपन करण्यासाठी भरणी केले आहेत. मात्र, नदीपात्र कोरडे पडल्याने महागडी लागवड टाकून केलेले श्रम वाया जाणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Kolhapur Drought Condition
PM Kisan Farmers : PM किसानचा 16वा हप्ता जमा झाला नाही? शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी?

दरवर्षी फेब्रुवारी ते जून या चार ते पाच महिन्यांत दूधगंगा नदी पात्र पाच ते सहा वेळा कोरडे पडते. गेल्या वर्षी तर तब्बल नऊ वेळा दूधगंगा नदीपात्र कोरडे पडले होते. सध्या दूधगंगा नदीवर कोणतीही मोठी योजना अद्याप तरी कार्यान्वित नाही. इचलकरंजीसाठी मंजूर झालेली योजना कार्यान्वित होऊ द्यायची नाही, असा निर्धार या सर्वांनी केला आहे.

पाणी सोडण्याची मागणी

सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने शेतकऱ्यांना पिकांना जगवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे जलसंपदा विभागाने लवकरात लवकर दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी दत्तवाडसह परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com