Water Shortage Kolhapur
Water Shortage Kolhapuragrowon

Water Shortage Kolhapur : ऊस पट्ट्यातच नद्या पडल्या कोरड्या, शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता

Sugarcane Area Drought : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
Published on

Sugarcane Area Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, तसेच गडहिंग्लज तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या वारंवार कोरड्या पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याती ऊस आणि भाजीपाला उत्पादन घेत असलेल्या नदी काठच्या गावांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मागच्या महिनाभरात तिसऱ्यांदा पंचगंगा आणि दुधगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे ऊस आणि भाजीपाला उत्पादनावर परिणाम होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही शेतकऱ्यांच्या विहीरींना आणि कुपनलिकांनाही पाणी कमी आल्याने पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.

शिरोळ तालुक्यात कृष्णा, दूधगंगा नदीच्या पाठोपाठ पंचगंगा नदीचेही पात्र कोरडे पडले आहे. दोन दिवसांपासून नांदणी (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने उसासह भाजीपाला धोक्यात आला आहे. त्यामुळे नांदणी व धरणगुत्ती परिसरातील शेतकरी कोंडीत अडकले आहेत.

गेल्या अनेक वर्षांत महापुराची भयावह स्थिती अनुभवलेल्या शिरोळ तालुक्याला संभाव्य पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. नदीपत्रात पाणी नाही, अशी स्थिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळत असल्याने आगामी दोन महिन्यांच्या काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे.

Water Shortage Kolhapur
Drought Conditions : राज्यात दुष्काळाचे संकट गडद; मोठ्या धरणांमध्ये ३७.९१ पाणीसाठा

कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्याची लेव्हल ११ झाली तर बॅकवॉटरला सुरुवात होते आणि १४ फुटांवर गेली तर बॅकवॉटरचे पाणी नांदणीपर्यंत येते. मात्र, बॅकवॉटरचीही सोय केलेली नाही. सध्या नांदणी येथे पंचगंगा नदी कोरडी पडली आहे. नांदणी, हरोली, जांभळी, टाकवडे, शिरढोण, धरणगुत्ती यासह परिसरात कोबी, फ्लॉवर, टोमॅटो यासह भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो.

मात्र, पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. त्यामुळे पात्रात तत्काळ पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

पंचगंगा नदीत पाण्याची टंचाई असल्याने वरिष्ठ विभागाकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाणी उपलब्ध झाले आहे. तेरवाड बंधारा भरला असून, यातून पाणी सोडले आहे. त्यामुळे लवकरच नांदणी परिसरातील पंचगंगा नदीत पाणी उपलब्ध होईल.

शंशाक शिंदे, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, कुरुंदवाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com